घुमट तोडल्याचे मला कधीच दुःख नाही …. कल्याण सिंह; जाणून घ्या ‘हे’ किस्से

बाबरी मस्जिदचा घुमट तोडल्याचे दुःख ना तेव्हा होते ना आता आहे. याउलट राममंदिर बांधण्याच्या निर्णयामुळे मी इतका आनंदी आहे- कल्याण सिंह

  उत्तरप्रदेश: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यपाल कल्याण सिंह वयाच्या ८९ व्या वर्षी (शनिवारी) अखेरचा श्वास घेतला. कल्याण सिंह यांना दोन महिन्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ७ दिवस व्हेंटिलेटरवर होते. २१ जून रोजी त्यांना लखनौच्या लोहिया रुग्णालयात श्वास घेण्यात अडचण आल्यामुळे दाखल करण्यात आले. यानंतर, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना ४ जुलै रोजी पीजीआयमध्ये हलवण्यात आले. अयोध्येतील बाबरी मस्जिद घटनेमुळे चर्चेत आलेल्या कल्याण सिंह प्रसिद्ध याची ही वक्तव्यही खूप प्रसिद्ध झाली.

  १)कारसेवकांनी  घुमट तोडण्यास सुरुवात केली
  ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मस्जिदचा घुमट कोसळताच कल्याणसिंह यांनी स्वतः राजीनामा लिहून राजीनामा दिला, परंतु त्यांना आयुष्यात कधीही मस्जिद पाडल्याचा खेद वाटला नाही. वास्तू पाडल्यानंतर एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी एक किस्सा सांगितला. ६ डिसेंबर १९९२ रोजी केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांना फोन केल्याचे कल्याणने सांगितले होते.ते म्हणाले अशी माहिती आहे की कार सेवक घुमटावर चढले आहेत ? मी त्यांना उत्तर दिले की माझ्याकडे एक पाऊल पुढे माहिती आहे, की त्यांनी घुमट तोडण्यास सुरुवात केली आहे.

  २) राममंदिर बांधण्याच्या निर्णयामुळे मी आनंदी

  राम मंदिराच्या बांधकामाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय २०१९ मध्ये आला, तेव्हा एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, बाबरी मस्जिदचा घुमट तोडल्याचे दुःख ना तेव्हा होते ना आता आहे. याउलट राममंदिर बांधण्याच्या निर्णयामुळे मी इतका आनंदी आहे, की आता मी शांततेत मरण्यास तयार आहे.

  ३) बाबरी मस्जिद पडली तर तिची किंमतही आम्ही मोजली
  अयोध्या हे रामाचे जन्मस्थान आहे. बाबरी मस्जिद म्हणण्यावर माझा आक्षेप आहे. तो एक ढाचा होता. ६डिसेंबर १९९२ रोजी घडलेली घटना पूर्वनियोजित नव्हती तर अनेक काळापासून कोट्यवधी हिंदूंच्या ठेचल्या गेलेल्या,दबल्या गेलेल्या भावनाचा प्रतिक्रियेचा हा एक उत्स्फूर्त स्फोट होता. जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी माझ्यावर जबाबदारी घेतली.मी दुसऱ्याला दोष का द्यायचा? जे घडले त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतो. रचना गेल्यावर त्याची किंमत मोजावी लागली. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता दुसरा कोणी आमचा जीव घेईल का? जर सरकारला राम मंदिर बांधण्यासाठी १०वेळा बलिदान द्यावे लागेल, तर आम्ही तयार आहोत. कारण हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न आहे.

  ४)बाबरी पाडणे ही अभिमानाची बाब
  बाबरी मस्जिद पडल्याचा मला कोणत्याही प्रकारचा खेद नाही, याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. किंवा मला कोणतेही दु: ख वाटत नाही. जे घडले ते राम मंदिराची इच्छा होती. बाबरी मस्जिद तोडल्यानंर लोक म्हणतात की ही राष्ट्रीय लाजिरवाणी बाब आहे. मात्र मी म्हणतो की ही राष्ट्रीय अभिमानाची बाब आहे. घुमट कोसळल्यानंतर मी राजीनामा दिला.

  ५) इतिहासात लिहिताना अयोध्येतील राम मंदिराची नोंद होईल

  जेव्हा इतिहास लिहिले जाईल, ५ ऑगस्ट,२०२० ची तारीख देखील १५ ऑगस्ट, २६ जानेवारी सारखी अमिट असेल. या दिवशी राम मंदिराचे भूमिपूजन झाले. त्याच पानावर असेही लिहिले जाईल की ६ डिसेंबरला घुमट पडला गेला, त्यामुळे सरकारही गेले. माझ्या जीवनाची आकांक्षा होती ,की राम मंदिर बांधले जावे. मंदिर बांधल्याबरोबर मी मोठ्या समाधानाने जग सोडून जाईल.
  ( वरील सर्व वक्तव्य विविध वृत्तवाहिन्यावरील मुलाखती , जनसभामधून करण्यात आली होती)