corona patients

वैज्ञानिक डॉ. रमण गंगाखेडकर(Dr. Raman GangaKhedkar) यांनी देशातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत(Corona Third Wave In India) मोठा दावा आहे.

    आयसीएमआरचे(इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च )(ICMR) माजी प्रमुख वैज्ञानिक डॉ. रमण गंगाखेडकर(Dr. Raman GangaKhedkar) यांनी देशातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत(Corona Third Wave In India) मोठा दावा आहे. “कोरोनाची तिसरी लाट संपूर्ण देशभरात येण्याची शक्यता कमी(Chances Of Corona Third Wave) आहे. जरी आलीच तरी ती दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी तीव्रतेची असेल”, असे गंगाखेडकर यांनी म्हटले आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे.

    डॉ. रमण गंगाखेडकर पुढे असंही म्हणाले की, देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता जरी कमी असली तरी शाळा पुन्हा सुरु करण्याची घाई करू नये. नव्या अभ्यासांनुसार लहान मुलांमध्येही कोरोनाचे दीर्घकालीन दुष्परिणाम आढळून आले आहेत. शाळा पुन्हा उघडण्याचा निर्णय सरसकट घेतला जाऊ नये. कोरोना रुग्णांच्या संख्येच्याआधारे ठराविक भागातील शाळा उघडण्याचा निर्णय घ्यावा.

    रमण गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले की, कोविड-१९ इन्फ्लूएन्झा व्हायरससारखा संपू शकतो. त्याचप्रमाणे कोरोना प्रतिबंधक लसीमुळे आता कोरोनाबाधित रुग्ण हे लक्षणेहीन (Asymptomatic) असू शकतात किंवा त्यांना अगदी सौम्य लक्षणं जाणवू शकतात. पर्यायाने चाचण्यांची आणि करोनाबाधितांची संख्या देखील कमी होऊ शकते.

    चौथ्या सिरो सर्वेनुसार, देशातील सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्येमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. लसीकरणाची व्याप्ती वाढेल तसतसे देशातील हॉस्पिटलायझेशन, गंभीर आजार आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्याही कमी होईल. कोरोना प्रकरणांची संख्या कायम राहू शकते. मात्र नवीन स्ट्रेन येईपर्यंत काळजी करायची गरज नाही.