पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाही तर काँग्रेस ५० वर्षे विरोधातच : गुलाम नबी आझाद

गुलाम नबी आझाद म्हणाले की, तुम्ही जेव्हा एखादी निवडणूक लढता तेव्हा कमीतकमी ५१ टक्के मतं तुमच्या बाजूनं असतात आणि पक्षात केवळ तुम्ही २ ते ३ लोकांच्या विरोधात निवडणूक लढवता. ५१ टक्के मतं मिळणाऱ्या व्यक्तीचीच त्या पदावर नियुक्ती केली जाते. जी व्यक्ती जिंकेल तिच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाईल.

जर पक्षांतर्गत निवडणुका झाल्या तर पक्षाची कामगिरी पहिल्यापेक्षाही उत्तम होईल. अन्यथा पुढील ५० वर्षेदेखील काँग्रेस (Congress ) विरोधकांच्याच भूमिकेत दिसेल, असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी पक्षाला सल्ला दिला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांविषयी काँग्रेसमध्ये विरोधाची भावना निर्माण झाल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. यावर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी भूमिका मांडली असून, सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या नेत्यांपैकी एक असलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पत्र लिहिलेल्या नेत्यांविरूद्ध बोलणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

गुलाम नबी आझाद म्हणाले की, तुम्ही जेव्हा एखादी निवडणूक लढता तेव्हा कमीतकमी ५१ टक्के मतं तुमच्या बाजूनं असतात आणि पक्षात केवळ तुम्ही २ ते ३ लोकांच्या विरोधात निवडणूक लढवता. ५१ टक्के मतं मिळणाऱ्या व्यक्तीचीच त्या पदावर नियुक्ती केली जाते. जी व्यक्ती जिंकेल तिच्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाईल.

जे पदाधिकारी वा राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष आमच्या प्रस्तावाचा विरोध करत आहेत, त्यांना माहिती आहे की निवडणुका झाल्यास ते कुठेच दिसणार नाही. जे कुणी काँग्रेसच्या हिताचा विचार करत आहेत, ते आमच्या पत्राचं स्वागत करतील, असं आझाद यांनी म्हटलं आहे.