स्वॅब टेस्ट केल्यावर जर रुग्णाची CT व्हॅल्यू ‘इतकी’ येत असेल तर त्यांना आता कोरोनाबाधित समजले जाणार नाही ; केंद्र सरकारचे निर्देश

केंद्रातील आरोग्य सचिव बलराम भार्गव यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत. करोना संशयितांची 'आरटी-पीसीआर' टेस्ट केल्यानंतर 'सिटी व्हॅल्यू' काढली जाते. त्यामध्ये जर 'व्हॅल्यू कमी' असेल तर तो जास्त बाधित समजले जाते.यापूर्वी हा स्कोर ४०पर्यंत असेल तर तो बाधित असे अहवालात नमूद करण्यात येत होते. मात्र, आता ३५ पर्यंत स्कोर असेल तरच ती व्यक्‍ती बाधित म्हणून समजली जाणार आहे.

    पुणे : कोरोनाची लागण झाली आहे की नाही यासाठी जी स्वॅब टेस्ट केली जाते याबाबाबत आता नवीन निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.स्वॅब टेस्टमध्ये रुग्णाची ‘सिटी व्हॅल्यू’ काढली जाते. आजपर्यंत ४० पर्यंत ती व्हॅल्यू असेल, तर त्याला बाधित समजले जात होते. मात्र, आता ती ‘व्हॅल्यू’ ३५ पर्यंतच मोजण्यासंदर्भात केंद्राने सूचना काढल्या आहेत. ३५ पेक्षा जास्त ‘सिटी व्हॅल्यू’ असेल तर ती व्यक्‍ती बाधित नाही, असे यापुढे समजले जाणार आहे. त्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांना यातून दिलासा मिळणार असून, त्यांना बाधित समजले जाणार नाही.

    केंद्रातील आरोग्य सचिव बलराम भार्गव यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत. करोना संशयितांची ‘आरटी-पीसीआर’ टेस्ट केल्यानंतर ‘सिटी व्हॅल्यू’ काढली जाते. त्यामध्ये जर ‘व्हॅल्यू कमी’ असेल तर तो जास्त बाधित समजले जाते.यापूर्वी हा स्कोर ४०पर्यंत असेल तर तो बाधित असे अहवालात नमूद करण्यात येत होते. मात्र, आता ३५ पर्यंत स्कोर असेल तरच ती व्यक्‍ती बाधित म्हणून समजली जाणार आहे.

    सध्या केल्या जाणाऱ्या टेस्टमध्ये बाधितांची संख्या हजारोंनी वाढली आहे. परंतु त्यामध्ये लक्षणे नसलेल्यांचीही संख्या मोठी आहे. हे निदर्शनाला आल्यानंतर ‘आयसीएमआर’ने विविध विषाणू विज्ञान प्रयोगशाळांकडून याविषयी माहिती मागवली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि त्यांच्या अहवालानुसार, हा ‘सिटी व्हॅल्यू’ ‘कट ऑफ’ आता ३५ ला ठेवण्यात आला आहे. या बदलामुळे आता जवळपास २० टक्‍के रुग्णांना दिलासा मिळणार आहे. यामुळे बाधितांची संख्या जी हजारांनी दिसते, ती कमी होऊ शकणार आहे.