PUC प्रमाणपत्र वैध नसेल तर वाहनांना भरावा लागणार १० हजार रुपयांपर्यंत दंड

एका विशेष अभियानांतर्गत दिल्ली वाहतूक विभागाने दिल्लीत प्रदूषण पसरवणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली आहे. वैध प्रदूषण नियंत्रण (PUC) प्रमाणपत्र नसेल तर वाहनांच्या मालकांना १० हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : जर तुमच्याकडे वैध प्रदूषण नियंत्रण (PUC) प्रमाणपत्र नसेल आणि तुम्ही वाहन घेऊन रस्त्यांवर आलात तर तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. दिल्ली सरकारच्या वाहतूक विभागाने प्रदूषण पसरवणाऱ्या वाहनांविरोधात एक विशेष अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत खूप साऱ्या वाहनांवर दंड आकारण्यात आला आहे ज्यांच्याकडे वैध पीयुसी प्रमाणपत्र नव्हते.

परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत ४० टीम तैनात केल्या आहेत. ज्या PUC प्रमाणपत्रांची तपासणी करणार असून प्रदूषण पसरविणाऱ्या वाहनांवर दंड आकारणार आहेत. या टीम दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती द्वारे १३ प्रदूषण करणाऱ्या हॉटस्पॉटवर लक्ष केंद्रित करणार आहे. यात आनंद विहार, आरके पुरम, जहांगीरपुरी, विवेक विहार, मायापुरी सह अन्य ठिकाणांचाही समावेश आहे. या ठिकाणी हॉटस्पॉटवर आमच्या टीमसोबत अन्य अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यात दिल्ली वाहतूक पोलीस, अधिकारी दर्जाचे लोक लोकांच्या गाड्यांमधून पेट्रोल, डिझेलचेही नमुने घेत आहेत कारण त्यात भेसळ आणि अशुद्ध काही आहे का याचीही तपासणी होणार आहे.

पीयुसी केंद्रामध्ये अचानक गर्दीत झाली वाढ

१, सप्टेंबर, २०१९ पासून दिल्लीत लागू झालेल्या संशोधित मोटार वाहन अधिनियमांनुसार वैध पीयुसी प्रमाणपत्राशिवाय वाहन चालविल्यास १००० रुपये आकारण्यात येणारा दंड१०,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आला होता. दंडाची रक्कम दहापट वाढल्याने दिल्लीतील जवळपास १,००० पीयुसी केंद्रांमध्ये अचानक गर्दी वाढली होती आणि वाहतूक विभागाने त्या महिन्यात १४ लाख पीयुसी प्रमाणपत्र जारी केले होते.