आता स्वत:साठी तरी नियम पाळणार का? तुम्ही नियम पाळले नाही तर कोरोनाने तुमचा घात केलाच म्हणून समजा; भारतात दुसरी लाट नको रे बाबा, अमेरिका-युरोपमधील २ ऱ्या लाटेचा कहर वाईट

कोरोनाची ही गती पाहता पुन्हा एकदा जुने कडक नियम लागू होतील की काय? अशी भीती नक्कीच जनसामान्यांमध्ये जोर धरत आहे. असं होणं निश्चितच चिंताजनक असेल कारण अमेरिकेपासून युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट ही विनाशकारी ठरली आहे.

  नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेची शक्यता अत्यंत तीव्र झाली आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचे संकेत मिळाले आहेत. मात्र, संपूर्ण भारतात कोरोना व्हायरसची अशीच भयानक परिस्थिती राहिली तर देशात मोठा हाहाकार माजण्याची शक्यता आहे.

  अमेरिका आणि युरोपातील आकडेवारीकडे नजर टाकली तर लक्षात येतं की, भारतातील कोरोनाची दुसरी लाट अधिक जीवघेणी असेल. खरंतर अनेक संशोधकांनी वेगवेगळ्या अध्ययनांमध्ये याचा खुलासा केलाय की, कोरोना व्हायरसची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक आणि जीवघेणी ठरलेली आहे.

  भारतात आता कोरोनाने पुन्हा गतीने डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रात तर सगळ्यात वाईट परिस्थिती उद्भवली असून एकूण देशातील रुग्णसंख्येच्या ६५ टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळत आहेत. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊन असून मध्य प्रदेशातील भोपाळ आणि इंदूरमध्येही नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.

  कोरोनाची ही गती पाहता पुन्हा एकदा जुने कडक नियम लागू होतील की काय? अशी भीती नक्कीच जनसामान्यांमध्ये जोर धरत आहे. असं होणं निश्चितच चिंताजनक असेल कारण अमेरिकेपासून युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट ही विनाशकारी ठरली आहे.

  युरोपसहित जगभरातील ४६ देशांमध्ये ‘द इकॉनॉमिस्ट’ने कोरोना महासंकटाच्या दुसऱ्या लाटेच्या अभ्यासाचं विश्लेषण केलं आहे. तर युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी आणि युनिव्हर्सिटी ऑफ शिन्हुआने देखील अनेरिका आणि युरोपामध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचं विश्लेषण केलं आहे. यासोबतच स्पॅनिश फ्लू आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचं देखील विश्लेषण केलं गेलं आहे. यानंतर असा दावा केला गेला आहे की, ज्या देशांमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली आहे, तिथे अधिक हाहाकार माजला आहे.

  अमेरिकेत कोरोनाने घेतले लाखोंचे बळी

  युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी आणि युनिव्हर्सिटी ऑफ शिन्हुआच्या संशोधकांनी दावा केलाय की, युरोपाच्या तुलनेत अमेरिकेतील दुसऱ्या लाटेची गती थोडी संथ आहे. मात्र, अमेरिकेत देखील ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लाखो लोकांचा जीव घेतला आहे. अमेरिकेमध्ये मार्चपासून ऑक्टोबरपर्यंत कोरोनाची एकूण एक कोटी प्रकरणे समोर आली होती. मात्र, पुढच्या तीन महिन्यांतच ते वाढून दोन कोटींवर गेले.