corona patients

कोरोनाचा उच्चांक मे महिन्याच्या(corona patients will increase in first month of may)  पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या काळात देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असेल, असा दावा आयआयटी कानपूरचे प्राध्यापक पद्मश्री मणिंद्र अग्रवाल यांनी अभ्यासाअंती मांडला आहे.

  नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने(corona second wave) देशात हाहाकार उडाला असला, तरी अजूनही धोका टळलेला नाही. कोरोनाचा उच्चांक मे महिन्याच्या(corona patients will increase in first month of may)  पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या काळात देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असेल, असा दावा आयआयटी कानपूरचे प्राध्यापक पद्मश्री मणिंद्र अग्रवाल यांनी अभ्यासाअंती मांडला आहे.

  अग्रवाल यांच्या टीमने गेल्या आठवडाभरात देशातील विविध ठिकाणांच्या रुग्णांच्या सरासरीचा अभ्यास केला.  त्यावरुन त्यांनी हा निष्कर्ष मांडला आहे.

  महाराष्ट्रातील रुग्णसंख्या घटणार, इतर सात राज्यांत गाठणार उच्चांक
  प्रा. अग्रवाल यांच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रात कोरोनाने उच्चांक गाठलेला आहे. आता येत्या काही दिवसांत राज्यात रुग्णांची संखअया वाढण्याऐवजी कमी होताना पाहायला मिळेल. तर उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि राजस्थानमध्ये २० ते २० एप्रिल दरम्यान सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडतील. उत्तर प्रदेशमध्ये एकाच दिवशी ३२ हजार रुग्ण सापडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तर दिल्लीत ३० हजार, प. बंगालमध्ये ११ हजार तर राजस्थानमध्ये १० हजार तर बिहारमध्ये हा आकडा ९ हजारापर्यंत जाऊ शकतो.

  कुंभमेळा आणि निवडणूक प्रचार सभांचा फारसा परिणाम होणार नाही

  कुंभमेळा आणि प. बंगालमध्ये झालेल्या निवडणूक प्रचाराचा फारसा परिणाम कोरोना रुग्णसंख्येच्या फैलावावर होणार नाही, असे मत अग्रवाल यांनी मांडले आहे. काही प्रमाणात रुग्णसंख्या वाढली असली तरी संपूर्ण देशाच्या परिस्थितीत यामुळे फारसा बिघाड होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

  बंगाल, केरळ आणि तामिळनाडूत रुग्णसंख्या वाढवण्यावर जे प्रश्न उपस्थित करत आहेत ते महाराष्ट्र आणि दिल्लीतील रुग्णवाढीबाबत काय कारण सांगतील, असा प्रतिप्रश्न प्रा. अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन खुल्या जागेत करावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. त्यामुळे व्हायरसचा प्रभाव कमी होईल असे त्यांचे म्हणणे आहे.

  रुग्णसंख्या कमी झाल्यानंतरची बेफिकिरी अंगाशी

  पहिल्या लाटेत इमारतींमध्ये राहाणारे आणि मोठ्या घरांतील रहिवाशी हे घरात राहिल्याने कोरोनाच्या लाटेपासून वाचले होते. मात्र कष्टकरी मजूर, सामान्य गरीब ज्यांना दररोज काम करावे लागत होते. त्यांना याचा सर्वाधिक फटका बसला होता. पुढे रुग्णसंख्या घटली. लसीकरण सुरु झाल्यावर इमारतींमध्ये राहणारे मध्यमवर्गीय घरातून बाहेर फिरु लागले. त्यामुळे हा वर्ग या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक प्रभावित झाला आहे.प्रत्येक सोसायटीत नागरिक संक्रमित झाल्याचे दिसते आहे. यातच वेगवेगळ्या कोरोना स्ट्रेन्समुळेही रुग्णसंख्येत भर पडली आहे.

  प्रा. अग्रवाल यांच्या दाव्यानुसार तामिळनाडूत कोरोनाचा उच्चांक ६ मेपर्यंत येण्याची शक्यता आहे. अद्याप यातील काही माहिती अजून पूर्म मिळालेली नाही. गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक सारख्या राज्यांची आकडेवारी अजूनपर्यंत स्पष्ट नाही. या राज्यांचा अभ्यास अद्याप सुरु आहे.