रामदेवबाबांच्या ‘कोरोनील’वर आयएमएचं वादळ, त्याला मान्यता दिली कुणी? केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना आयएमएचा सवाल

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी रामबाण उपाय म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाला मान्यता देखील दिली होती. परंतु हे औषध पूर्णपणे सर्वसामान्यांची दिशाभूल करणारं आणि त्यांच्या आरोग्याशी खेळणारं आहे. त्याला मान्यता कुणी दिली? असे अनेक प्रश्न केंद्रीय आरोग्य मंत्र्यांवर आयएमएकडून उपस्थित केले जात आहेत.

    मागील काही दिवसांपासून रामदेव बाबा यांच्या कोरोनील औषधाची जागतिक स्तरावर चर्चा करण्यात आली. त्यांना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी रामबाण उपाय म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाला मान्यता देखील दिली होती. परंतु हे औषध पूर्णपणे सर्वसामान्यांची दिशाभूल करणारं आणि त्यांच्या आरोग्याशी खेळणारं आहे. त्याला मान्यता कुणी दिली? असे अनेक प्रश्न केंद्रीय आरोग्य मंत्र्यांवर आयएमएकडून उपस्थित केले जात आहेत.

    या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयंत लेले यांनी तसा ई-मेल पाठवून विचारणा केली असता, या औषधाला अशी कुठल्याही प्रकारची मान्यता दिली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने ट‌्वीट केले आहे. इतर कोणत्याही अधिकृत वैद्यकीय मान्यता देणाऱ्या संघटनांनीही मान्यता दिलेली नाही. तरीही अशी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती का दिली जात आहे, अशा प्रश्न डॉ. लेले यांनी उपस्थित केला आहे.

    दरम्यान, हा प्रकार पूर्णपणे सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा व त्यांच्या आरोग्याशी खेळ करणारा आहे. जिथे लस येण्यासाठी इतक्या महिन्यांचा कालावधी लागला, तिथे हे औषध कसे उपलब्ध झाले? त्याला कुणी मान्यता दिली, असा सवाल केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना आयएमएने विचारला आहे. त्यामुळे रामदेवबाबांच्या ‘कोरोनील’वर आयएमएचं वादळ फिरत असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.