२५ दिवसात एवढं महागलं इंधन, पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी गाठला उच्चांक…

आज सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. सोमवारी पेट्रोलच्या दरात 29 पैसे प्रति लीटरने वाढ करण्यात आली होती, तर डिझेल 30 पैशांनी महागलं होतं. आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 102.58 रुपये आणि डिझेलचे दर 94.70 रुपये प्रति लीटर आहेत.

  नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ होत आहे. देशातील सर्वच शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती आसमंताला भिडल्या आहेत. गेल्या 25 दिवसात पेट्रोलचे दर 06.09 रुपयांनी महागले आहेत.

  दरम्यान आज सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. सोमवारी पेट्रोलच्या दरात 29 पैसे प्रति लीटरने वाढ करण्यात आली होती, तर डिझेल 30 पैशांनी महागलं होतं. आज मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 102.58 रुपये आणि डिझेलचे दर 94.70 रुपये प्रति लीटर आहेत.

  किती महागलं 25 दिवसांत इंधन ?

  4 मे रोजी झालेल्या वाढीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्या आहेत. गेल्या 25 दिवसात पेट्रोलचे दर 06.09 रुपयांनी तर डिझेलचे दर 6.30 रुपयांनी महागले आहेत. अनेक शहरात डिझेलने उच्चांक गाठला आहे. तर देशातील अनेक महत्वाच्या शहरात पेट्रोलचे दर 102 रुपये प्रति लीटरपेक्षा अधिक आहेत.

  देशातील महत्त्वाच्या शहरातील पेट्रोलचे दर

  • दिल्ली- पेट्रोल 96.41 रुपये आणि डिझेल 87.28 रुपये प्रति लीटर
  • मुंबई- पेट्रोल 102.58 रुपये आणि डिझेल  94.70 रुपये
  • कोलकाता- पेट्रोल 96.34 रुपये आणि डिझेल  90.12 रुपये
  • चेन्नई- पेट्रोल 97.69 रुपये आणि डिझेल 91.92 रुपये
  • पाटणा- पेट्रोल 98.49 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लीटर
  • रांची- पेट्रोल 92.51 रुपये आणि डिझेल  92.13 रुपये प्रति लीटर
  • लखनऊ- पेट्रोल 93.63 रुपये आणि डिझेल 87.68 रुपये प्रति लीटर
  • बेंगळुरु- पेट्रोल 99.63 रुपये आणि डिझेल 92.52 रुपये प्रति लीटर
  • जयपूर- पेट्रोल 103.03 रुपये आणि डिझेल 96.24 रुपये प्रति लीटर
  • श्रीगंगानगर- पेट्रोल 107 रुपये आणि डिझेल रिकॉर्ड 100 रुपये प्रति लीटरपेक्षा जास्त
  • रीवा- पेट्रोल 106.81 रुपये आणि डिझेल 97.96 रुपये प्रति लीटर
  • भोपाळ- पेट्रोल 104.59 रुपये आणि डिझेल  95.91 रुपये प्रति लीटर
  • परभणी- पेट्रोल 104.92 रुपये आणि डिझेल 95.50 रुपये प्रति लीटर
  • रायपूर- पेट्रोल 94.60 रुपये आणि डिझेल 94.40 रुपये प्रति लीटर
  • गांधीनगर- पेट्रोल 93.54 रुपये आणि डिझेल 94.17 रुपये प्रति लीटर
  • भुवनेश्वर- पेट्रोल 97.16 रुपये आणि डिझेल 95.11 रुपये प्रति लीटर
  • गुरुग्राम- पेट्रोल 94.19 रुपये आणि डिझेल 87.87 रुपये प्रति लीटर
  • नोएडा- पेट्रोल 93.74 रुपये आणि डिझेल 87.76 रुपये प्रति लीटर
  • चंडीगड- पेट्रोल 92.73 रुपये आणि डिझेल 86.92 रुपये प्रति लीटर