महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन काकांची झाली गोची; पुढे घडलं असं काही की…

एका महागड्या रेस्टॉरंटमध्ये ही व्यक्ती जेवणासाठी गेली होती. मोठ मोठ्या रेस्टॉरंटमध्ये प्लेटवर विविध आकर्षक पद्धतीने नॅपकीन फोल्ड करून ठेवण्याची पद्धत असते. मात्र ही व्यक्ती मात्र याबाबत अनभिज्ञ होती. तिला वाटलं हा तर खाण्याचा प्रकार आहे. म्हणून सुरी-काटा घेऊन ही व्यक्ती तो पदार्थ तोडण्याचा प्रयत्न करू लागली.

    नवी दिल्ली : प्रत्येकजण आयुष्यात अनेक गोष्टी पहिल्यांदाच करतो. त्याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. तुम्ही पहिल्यांदा एखाद्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये (expensive restaurant) गेला होता तेव्हा अशी एखादी गोष्टी तरी असेल ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल. कारण जेव्हा पहिल्यांदा अशा ठिकाणी जातो तेव्हा फजिती होण्याची शक्यता अधिक असते. असाच काहीसा प्रकार या व्हिडिओतील व्यक्तीसोबत झाला.

    एका महागड्या रेस्टॉरंटमध्ये ही व्यक्ती जेवणासाठी गेली होती. मोठ मोठ्या रेस्टॉरंटमध्ये प्लेटवर विविध आकर्षक पद्धतीने नॅपकीन फोल्ड करून ठेवण्याची पद्धत असते. मात्र ही व्यक्ती मात्र याबाबत अनभिज्ञ होती. तिला वाटलं हा तर खाण्याचा प्रकार आहे. म्हणून सुरी-काटा घेऊन ही व्यक्ती तो पदार्थ तोडण्याचा प्रयत्न करू लागली. बराच वेळ झाला तरी तो पदार्थ काही तुटेना. शेवटी आजूबाजूला पाहून हळूच व्यक्तीने त्याला हात लावून उलगडलं, तर लक्षात आलं की हा तर नॅपकिन आहे. त्यानंतर व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलला. असा मजेशीर प्रकार प्रत्येकसोबत कधीना कधी झाला असेल, मात्र या व्यक्तीसोबतचा हा मजेशीर प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

    अनेकजण या व्हिडिओला खूप प्रतिक्रिया देत आहे. अर्थात एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुम्हाला यातील काही गोष्टी माहिती नसल्या तरी यात काही कमीपणा नक्कीच नाही. (Man Cuts Napkin With Knife-Fork). मात्र त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव लोकांना खूप आवडले असून प्रेक्षक हा व्हिडिओ एन्जॉय करीत आहेत. या व्यक्तीचे शेवटचे हावभाव तर अत्यंत मजेशीर आहेत. अर्थात त्यांना शेवटी खूप लाजल्यासारखं झालं असेल.

    in an expensive restaurant uncle got confused live watch the funny video and smile