अयोध्येत रामजन्मभूमीतील पुजाऱ्यासह १६ पोलिसांना कोरोनाची लागण

रामजन्मभूमीत ५ ऑगस्टला भूमिपूजन (Bhoomi Pujan in Ayodhya) होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भूमिपूजनासाठी येणार आहेत. अयोध्येत(Ram Mandir Ayodhya) सोहळ्याची तयारी वेगाने सुरू आहे. अशातच येथील पुजाऱ्याला (Ayodhya priest test corona positive) कोरोनाची लागण झाल्याने येथे गोंधळ उडाला आहे.

अयोध्या : ५ ऑगस्टला राममंदिरासाठी होणाऱ्या भूमिपूजनाची जोरदार तयारी सुरू असताना या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. रामलल्लाच्या एका पुजाऱ्यासह सुरक्षेसाठी तैनात असलेल्या डझनाहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रिपोर्ट आल्यानंतर या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यांच्या संपर्कात येणाऱ्या अन्य लोकांचेही स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे. मंदिरातील या लोकांच्या संपर्कात आलेल्या भक्तांच्या स्वॅबचेही नमुने घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

रामजन्मभूमीत ५ ऑगस्टला भूमीपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमीपूजनासाठी येणार आहेत. अयोध्येत सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांनीही अयोध्येत सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे.

नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले

राम जन्मभूमीतील सहाय्यक पुजाऱ्याची तब्येत बिघडल्यानंतर यांचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. यासोबतच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांचीही तपासणी करण्यात आली. गुरूवारी सहाय्यक पुजाऱ्याच्या आलेल्या रिपोर्टनंतर या ठिकाणी एकच गोंधळ उडाला.

पॉझिटिव्ह आलेले पुजारी आहेत मुख्य पुजाऱ्याचे शिष्य

सहाय्यक पुजारी हे रामलल्ला मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य आहेत. पॉझिटिव्ह पुजाऱ्याला घरातच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. आता आणखी लोकांचे नमुने घेण्यात येत आहेत कारण त्यांचीही कोरोना विषाणूची बाधा झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रामजन्मभूमीचा संपूर्ण परिसर सॅनिटाइझ करण्यात येत आहे.