दीराच्या लग्नाच्या मिरवणुकीत वहिनीने केलाय ढासू डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धुमाकूळ

सोशल मीडियावर लग्नात वधू आणि वर नृत्य, नागिन नृत्य आणि इतर लोकांच्या नृत्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या दिवसात, दीराच्या लग्नाच्या मिरवणुकीत वहिनी नाचत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

    नवी दिल्ली : लग्नात (Wedding) मजामस्तीचे वातावरण असते. लग्नात सगळेच नाचतात. लग्नात अनेक विधी असतात. लग्नात लोकांना खूप आनंद मिळतो. लग्नाशी संबंधित अनेक मजेदार नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे पाहून लोकांना अनेकदा हसू आवरता आवरत नाही. भारतीय लग्नसोहळ्यांमध्ये नाच-गाणे होत नाही असं होऊच शकत नाही. लोकं लग्नात खूप आनंदाने नाचतात.

    सोशल मीडियावर लग्नात वधू आणि वर नृत्य, नागिन नृत्य आणि इतर लोकांच्या नृत्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या दिवसात, दीराच्या लग्नाच्या मिरवणुकीत वहिनी नाचत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओत, पाहिले जाऊ शकते की, घोड्यावर बसलेल्या वरासमोर, वहिनी तिच्या दीराच्या लग्नात प्रसिद्ध बॉलीवूड गाणे- “लो चली मैं अपना देवर की बारात लेके” वर नाचताना दिसत आहे.

    पाहा व्हिडिओ :


    हा व्हिडिओ पाहून लोकंही या वहिनीच्या नृत्याचं भरभरून कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ ११ हजारांहून अधिक जणांनी लाइक केला आहे. युजर्स व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही देत आहेत. वहिनीचा हे जबरदस्त नृत्य पाहून तुम्हीही वहिनीचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.