दिल्ली हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या आरोपपत्रात सीताराम येचुरी, योगेंद्र यादव यांचं नाव

दिल्लीमध्ये झालेल्या दंगलप्रकरणी (Delhi riots case) दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आपल्या आरोपपत्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे (Marxist Communist Party) सरचिटणीस सीताराम येचुरी (Sitaram Yechury) , स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव (Yogendra Yadav ) , अर्थतज्ज्ञ जयंती घोष ( Jayanti Ghosh) , दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक आणि मानवाधिकार कार्यकर्ते अपूर्वानंद तसेच माहितीपट निर्माते राहुल रॉय (Rahul Roy) यांची नावं दंगलीचा कट रचणाऱ्यांच्या नावांमध्ये समाविष्ट केली आहेत.

फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये झालेल्या दंगलप्रकरणी (Delhi riots case) दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) आपल्या आरोपपत्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे (Marxist Communist Party) सरचिटणीस सीताराम येचुरी (Sitaram Yechury) , स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव (Yogendra Yadav ) , अर्थतज्ज्ञ जयंती घोष ( Jayanti Ghosh) , दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक आणि मानवाधिकार कार्यकर्ते अपूर्वानंद तसेच माहितीपट निर्माते राहुल रॉय (Rahul Roy) यांची नावं दंगलीचा कट रचणाऱ्यांच्या नावांमध्ये समाविष्ट केली आहेत.

सीताराम येचुरी यांनी दिल्ली पोलिसांवर जोरदार टीकास्त्र सोडले (Sitaram yechury was criticized to delhi police) होते. हे चुकीचे आणि अवैध असल्याचे म्हणत येचुरी यांनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांच्या इशाऱ्यावर दिल्ली पोलिसांनी उचललेले हे पाऊल असल्याचे म्हटले आहे. येचुरी यांनी अनेक ट्विट करत केंद्र सरकारवरही निशाणा साधला होता.

दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, या लोकांनी नागरिकता संशोधन विधेयकाचा (CAA) विरोध करणाऱ्यांना कोणतीही हद्द पार करा, असा सल्ला दिला होता. सीएए-एनआरसीला मुस्लिम विरोधी सांगत या समाजात नाराजी पसरवली आणि केंद्र सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी निषेध आंदोलनाचे आयोजन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

दिल्ली दंगलीत एकूण ५३ लोकांचा मृत्यू झाला असून यात ५८१ लोक जखमी झाले होते. यांपैकी ९७ लोक गोळी लागून जखमी झाले होते, असा दावा दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.