जानेवारी ते फेब्रुवारीच्या काळात २६ वेळा दरवाढ, २० दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर

निवडणूक (no fuel prize hike after election)तारखांची घोषणा झाल्यापासून आजवर इंधन दरात एकवेळाही वाढ करण्यात आली नाही. यापूर्वी २०२१ च्या प्रारंभिक दोन महिन्यात मात्र २६ वेळा इंधन दरात वाढ(fuel prize hike) करण्यात आली होती.

    दिल्ली: निवडणूक आयोगाने २७ फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीत विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. याच दिवशी देशात पेट्रोल – डिझेलच्या दरात (petrol diesel prize) २० ते ३० पैशांची वाढ करण्यात आली होती. निवडणूक तारखांची घोषणा झाल्यापासून आजवर इंधन दरात एकवेळाही वाढ करण्यात आली नाही. यापूर्वी २०२१ च्या प्रारंभिक दोन महिन्यात मात्र २६ वेळा इंधन दरात वाढ करण्यात आली होती.

    कंपन्यांना तोटा
    किमती ‘जैसे थे’ असल्यामुळे पेट्रोल-डिझेल वितरक आयओसी, एचपीसीएल आणि बीपीसीएलसारख्या कंपन्यांना तोटा होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपन्यांना एक लिटर पेट्रोलवर ४ रुपये आणि डिझेलवर २ रुपयांचा तोटा होत आहे. या २० दिवसात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली असून एक्साईज ड्युटी आणि व्हॅटमध्येही कोणतीच कपात करण्यात आलेली नाही. या तोट्याची भरपाई करण्यासाठी कंपन्यांनी याचा भार ग्राहकांवर टाकला तर मात्र मुंबईत ९९ रुपयांचे असलेले पेट्रोल १०३ रुपयांवर पोहोचेल.

    राजस्थानात होता सर्वाधिक दर
    २०२१ मध्ये जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान २६ वेळा इंधन दरात वाढ झाली आहे. मार्चमध्ये ही दरे स्थिर होती. देशात एक लिटर पेट्रोलची किंमत १०० रुपये प्रथमच १७ फेब्रुवारी रोजी झाली होती. हा दर राजस्थानातील श्रीगंगानगर येथील होता. १९ मार्चपर्यंत येथे १०१.७५ रुपये दर होता.