देशात अनेक राज्यांमध्ये सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी पार केली ; केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं कारण

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने तसंच केंद्रीय आणि राज्यांच्या करांमुळे इंधनाचे दर वाढले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दरवाढीचं नवं कारण दिलं आहे.

    कोरोनामुळे हैराण झालेले नागरिक या इंधनदरवाढीमुळे अधिकच संकटात सापडले आहेत. अशातच आता केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी या भाववाढीबद्दलचा खुलासा केला आहे. जनकल्याणाच्या योजनांमुळे इंधनाचे भाव वाढलेत, असं त्यांचं म्हणणं आहे.

    आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने तसंच केंद्रीय आणि राज्यांच्या करांमुळे इंधनाचे दर वाढले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दरवाढीचं नवं कारण दिलं आहे.

    राहुल गांधींनी इंधन दरवाढीवर केलेल्या टीकेबद्दल जेव्हा प्रधान यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते म्हणाले, जर राहुल गांधींना गरीबांची एवढीच काळजी वाटते, तर त्यांनी काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या राज्यातल्या इंधनांचे दर कमी करण्यास सांगावे.