देशात गेल्या २४ तासात ५२ हजार ५०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

  • देशात कोरोना बाधितांचा एकूण आकडा १९ लाख ८ हजार २५५ वर पोहोचला आहे. त्यातील ५ लाख २४४ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर १२ लाख ८२ हजार २१६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे घरी सोडण्यात आली आहे. कोरोनामुळे ३९ हजार ७९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकार कठोर निर्णय घेत आहे. तसेच देशात लॉकडाऊन लागू केला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने देशातील कोरोना रुग्णांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या २४ तासात देशात ५२ हजार ५०९ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर कोरोनामुळे ८५७ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.  

देशात कोरोना बाधितांचा एकूण आकडा १९ लाख ८ हजार २५५ वर पोहोचला आहे. त्यातील ५ लाख २४४ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. तर १२ लाख ८२ हजार २१६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे घरी सोडण्यात आली आहे. कोरोनामुळे ३९ हजार ७९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात उपचार घेत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या लाखांच्या वर आहे. तसेच दुसऱ्या स्थानावर तमिळनाडूची नोंद आहे. तिसऱ्या स्थानावर कर्नाटकचा आहे. तसेच चौथ्या क्रमांकावर आंध्रप्रदेश आणि दिल्ली पाचव्या क्रमांकावर असल्याचे सांगितले आहे.