मागील २४ तासांत देशात ६४ हजार ५३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता २७ लाख ६७ हजार २७४ इतकी झाली आहे. तर ६ लाख ७६ हजार २७४ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. दरम्यान, आतापर्यंत २० लाख ३७ हजार ८७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, देशातील एकूण मृतांची संख्या ५२ हजार ८८९ वर पोहोचली आहे.

संपूर्ण देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशामध्ये ६४ हजार ५३१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १ हजार ०९२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशात एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २७ लाखांच्या वर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता २७ लाख ६७ हजार २७४ इतकी झाली आहे. तर ६ लाख ७६ हजार २७४ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. दरम्यान, आतापर्यंत २० लाख ३७ हजार ८७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, देशातील एकूण मृतांची संख्या ५२ हजार ८८९ वर पोहोचली आहे. 

दरम्यान, देशात होणाऱ्या कोरोना चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काल मंगळवारी देशात ८ लाख १ हजार ५१८ जणांची चाचणी करण्यात आली. देशात १८ ऑगस्टपर्यंत एकूण ३ कोटी १७ लाख ४२ हजार ७८२ कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.