देशात मागील २४ तासांत ६९ हजार ९२१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, देशात ३६ लाख ९१ हजार १६७ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यामध्ये ७ लाख ८५ हजार ९९६ ॲक्टिव्ह केसेस (active cases) आहेत. तर २८ हजार ३९ हजार ८८३ जण कोरोनामुक्त (discharged) झाले आहेत. मात्र, देशातील एकूण मृत व्यक्तींची संख्या ६५ हजार २८८ इतकी झाली आहे.

देशात कोरोना विषाणूचे (corona virus) संकट दिवसागणिक वाढत आहे. देशात मागील काही दिवसांपासून ८० हजारांच्या आसपास कोरोना रूग्णांची नोंद होत असताना, आज मंगळवारी कोरोना रूग्णांच्या संख्येत थोडीशी घट झालेली पाहायला मिळत आहे. देशात मागील २४ तासांत ६९ हजार ९२१ इतक्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांची ( new positive cases)  नोंद करण्यात आली आहे. तर मृत रुग्णांची (deaths ) संख्या ८१९ इतकी आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या ३६ लाखांच्या वर गेली आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, देशात ३६ लाख ९१ हजार १६७ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यामध्ये ७ लाख ८५ हजार ९९६ ॲक्टिव्ह केसेस (active cases) आहेत. तर २८ हजार ३९ हजार ८८३ जण कोरोनामुक्त (discharged) झाले आहेत. मात्र, देशातील एकूण मृत व्यक्तींची संख्या ६५ हजार २८८ इतकी झाली आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाच केंद्र सरकारकडून अनलॉक-४ ची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारनंतर राज्य सरकारने सुद्धा अनलॉक-४ ची नवीन नियमावली जाहीर केली आहे. तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) ३१ ऑगस्टपर्यंत ४ कोटी ३३ लाख २४ हजार ८३४ चाचण्या करण्यात आल्या असल्याचं सांगितलं आहे.