गेल्या २४ तासांत देशात ७२ हजार ४९ नव्या रूग्णांची नोंद, तर ९८६ जणांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ७२ हजार ४९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ९८६ जणांचा मृत्यू झाला आहे. ६७ लाख ५७ हजार १३२ इतकी कोरोना संख्या झाली असून, ९ लाख ७ हजार ८८३ रुग्ण उपचार घेत (active cases) आहेत.

देशात कोरोना विषाणूचा (corona virus)  प्रभाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ७२ हजार ४९ नवीन रुग्ण (new cases) आढळून आले आहेत. तर ९८६ जणांचा मृत्यू (deaths ) झाला आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या वाढून आता ६७ लाखांच्या वर (crosses 67-lakh ) पोहोचली आहे. २४ तासांत जागतिक उच्चांक नोंदवलेल्या भारतातील कोरोना रुग्णवाढ उतरणीला लागली आहे. ऑगस्टनंतर मागील दोन आठवड्यांपासून कमी रुग्ण आढळून येत असल्याचं चित्र आहे. तर ऑगस्टनंतरची सर्वात कमी रुग्णवाढ नोंदवण्यात आली.

आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ७२ हजार ४९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ९८६ जणांचा मृत्यू झाला आहे. ६७ लाख ५७ हजार १३२ इतकी कोरोना संख्या झाली असून, ९ लाख ७ हजार ८८३ रुग्ण उपचार घेत (active cases) आहेत. तर ५७ लाख ४४ हजार ६९४ रुग्ण कोरोनावर मात करून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील आतापर्यंतचा कोरोनाबळींचा आकडा १ लाख ४ हजार ५५५ वर (discharged) पोहोचला आहे.

राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या घटतानाच बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मंगळवारी जवळपास १२ हजार नवे रुग्ण आढळले तर दिवसभरात १७ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांचे प्रमाण ८०.४८ टक्क्यांवर गेले आहे.