देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ७७ हजार २६६ नव्या रूग्णांची नोंद

आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ लाख ८७ हजार ५०१ इतकी झाली आहे. देशात सध्या ७ लाख ४२ हजार २३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर २५ लाख ८३ हजार ९४८ कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, आतापर्यंत ६१ हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील २४ तासांत देशात ७७ हजार २६६ नव्या कोरोना (New cases) रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच १ हजार ५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू (deaths) झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ लाखांच्या (COVID-19 case tally at 33.87 lakh) पुढे गेली आहे. मागील दोन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसाला ७५ हजारांपेक्षा जास्तने वाढत आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ लाख ८७ हजार ५०१ इतकी झाली आहे. देशात सध्या ७ लाख ४२ हजार २३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर २५ लाख ८३ हजार ९४८ कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, आतापर्यंत ६१ हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 देशात कोरोना चाचणीची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे रुग्णसंख्याही वाढत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तरप्रदेश आणि तामिळनाडू या प्रमुख राज्यांमध्ये देखील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. देशातील काल गुरूवारी आढळलेल्या कोरोना रूग्णांची संख्या पाहता, आज पुन्हा एकदा रूग्णांची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.