corona

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ८० हजार ४७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ६२ लाख २५ हजार ७६४ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ५१ लाख ८७ हजार ८२६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

देशात कोरोना बाधितांच्या संख्येत आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येनं आता ६२ लाखांचा टप्पा (crosses 62-lakh mar)  पार केला आहे.  गेल्या चोवीस तासांमध्ये देशात ८० हजार ७७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद (new cases)  करण्यात आली. तर १ हजार १७९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू (deaths ) झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ८० हजार ४७२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ६२ लाख २५ हजार ७६४ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ५१ लाख ८७ हजार ८२६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे देशात ९ लाख ४० हजार ४४१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू (active cases) आहे. आतापर्यंत कोरोनामुळे देशात ९७ हजार ४९७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.


दरम्यान, काल मंगळवारी देशात एकूण १० लाख ८६ हजार ६८८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशभरात ७ कोटी ४१ लाख ९६ हजार ७२९ कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.