कोरोनाचा कहर! गेल्या २४ तासांत देशात ८१ हजार ४८४ कोरोनाबाधितांची नोंद

केंद्रीय आरोग्य (Ministry of Health & Family Welfare)  विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ८१ हजार ४८४ कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ६३ लाख ९४ हजार ६९ एवढा झाला आहे. उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे ९९ हजार ७७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (corona virus) मोठ्या संख्येने होत आहे. गेल्या २४ तासांत देशात ८१ हजार ४८४ इतक्या नव्या रूग्णांची (new cases ) नोंद करण्यात आली आहे. तर १ हजार ९५ रूग्णांचा मृत्यू (deaths ) झाला आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. देशातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या ६४ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य (Ministry of Health & Family Welfare)  विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ८१ हजार ४८४ कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा ६३ लाख ९४ हजार ६९ एवढा झाला आहे. उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे ९९ हजार ७७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तर दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत सुमारे ५३ लाख ५२ हजार ७८ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (discharged) देण्यात आला आहे. सध्या देशातील विविध भागात ९ लाख ४२ हजार २१७ जणांवर उपचार सुरु आहे. तर आतापर्यंत उपचारादरम्यान सुमारे ९९ हजारांपेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.