मागील २४ तासांत देशभरात ८८ हजार ६०० नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare ) दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील एकूण ५९ लाख ९२ हजार ५३३ कोरोनाबाधितांमध्ये ९ लाख ५६ हजार ४०२ रूग्णांवर उपचार (active cases)  सुरू आहेत. तर ४९ लाख ४१ ६२८ जण कोरोनामुक्त (cured) झाले आहेत. मात्र, देशात आतापर्यंत ९४ हजार ५०३ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव (corona virus) देशभरात अद्यापही झपाट्याने वाढत आहे. मागील २४ तासांत (in the last 24 hours) देशात ८८ हजार ६०० इतक्या नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद ( new cases )  करण्यात आली आहे. तर १ हजार १२४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू (deaths ) झाला आहे. तसेच देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५९ लाख ९२ हजार ५३३ वर पोहचली आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare ) दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील एकूण ५९ लाख ९२ हजार ५३३ कोरोनाबाधितांमध्ये ९ लाख ५६ हजार ४०२ रूग्णांवर उपचार (active cases)  सुरू आहेत. तर ४९ लाख ४१ ६२८ जण कोरोनामुक्त (cured) झाले आहेत. मात्र, देशात आतापर्यंत ९४ हजार ५०३ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, देशात काल दिवसभरात ६,१२,५७,८३६ नमूने तपासण्यात आले असून, यातील ९ लाख ८७ हजार ८६१ नमून्यांची काल तपासणी झाली आहे. आयसीएमआरकडून ही माहिती समोर आली आहे.

२६ सप्टेंबर रोजी देशभरात ८५ हजार ३६२ नवे कोरोनाबाधित (new cases) आढळले होते. तर १ हजार ८९ रुग्णांचा मृत्यू (deaths) झाला. परंतु आज देशातील कोरोनाची संख्या पाहिली असता, ६० लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.