corona

देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ३५ लाख ४२ हजार ७३४ इतकी झाली आहे. यापैकी ७ लाख ६५ हजार ३०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर २७ लाख १३ हजार ९३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत एकूण ६३ हजार ४९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ७८ हजार ७६१ नव्या कोरोना रूग्णांची (New Cases) नोंद करण्यात आली आहे. तर ९४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Deaths ) झाला आहे. देशातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ३५ लाखांच्या वर (Crosses 35 Lakh Mark)  गेली आहे. तसेच सलग चौथ्या दिवशी देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत ७५ हजारांहून अधिक वाढ झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) दिलेल्या माहतीनुसार, देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ३५ लाख ४२ हजार ७३४ इतकी झाली आहे. यापैकी ७ लाख ६५ हजार ३०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर २७ लाख १३ हजार ९३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत एकूण ६३ हजार ४९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

दरम्यान, देशभरात काल शनिवारी तब्बल ७६ हजार ४७२ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. तर १ हजार २१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशातील कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ७६ टक्केंपेक्षा जास्त आहे. तसेच महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे.