देशात गेल्या २४ तासांत ४१ हजारांहून अधिक रुग्ण, तर ४४७ जणांचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात ४१,१०० नवे रुग्ण (Positive Patient) आढळून आले आहेत. आतापर्यंत देशात एकूण ८८,१४,५७९ रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी १,२९,६३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ८२,०५,७२८ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या ४,७९,२१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या (Corona Patients) संख्येत सातत्याने वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४१ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर ४४७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Corona Patient Death) देशात आता सध्या ४ लाख ७९ हजार ॲक्टिव्ह रुग्ण (Active Patients)आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात ४१,१०० नवे रुग्ण (Positive Patient) आढळून आले आहेत. आतापर्यंत देशात एकूण ८८,१४,५७९ रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी १,२९,६३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ८२,०५,७२८ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या ४,७९,२१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यात मागील २४ तासात ४,२३७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १७,४४,६९८ एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात २,७०७ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण ४५,९१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.