लग्न झालेल्या महिलांना रिलेशनशिपची ओढ, किती टक्के महिलांचे विवाहबाह्य संबंध?; सर्वेक्षणातील मोठा खुलासा

भारतातील ३० ते ६० वयोगटातील शहरी महिलांचा अँट्युटूड, त्यांचं शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबित्व याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये ४८ टक्के भारतीय महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये केवळ विवाहित महिलाच नव्हे तर मुलं झालेल्या महिलांचाही यात समावेश आहे.

    भारतात कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या खूपच चर्चिला जाणार विषय आहे. मात्र, यामध्ये पुरुष आणि महिलांमध्ये भेदभाव असल्याचे दिसून येते. जर स्त्रीने अशा प्रकारचं पाऊल उचललं तर त्याची मोठी चर्चा रंगते प्रसंगी संबंधित महिलेला बदनामीलाही सामोरं जावं लागतं. मात्र, महिलांकडून होणारा हा प्रकार चांगला की वाईट यावरही आता चर्चा सुरु व्हायला लागल्या आहेत. कारण, भारतात विवाहित महिलांच्या अफेअरच्या प्रमाणात वाढ झाल्याचा खुलासा एका सर्वेक्षणातून झाला आहे.

    किती टक्के महिलांचे विवाहबाह्य संबंध?

    भारतातील ३० ते ६० वयोगटातील शहरी महिलांचा अॅट्युटूड, त्यांचं शिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबित्व याचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये ४८ टक्के भारतीय महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये केवळ विवाहित महिलाच नव्हे तर मुलं झालेल्या महिलांचाही यात समावेश आहे.

    ‘या’ अॅपनं केलं सर्वेक्षण

    ‘ग्लिडन’ या फ्रेन्च एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अँपद्वारे एक अभ्यास करण्यात आला या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. ग्लिडन हा प्लॅटफॉर्म महिलांनी महिलांसाठी तयार केला आहे. खासकरुन ज्या महिला आधीच रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा त्यांचं लग्न झालेलं आहे अशा महिलांसाठी हे अँप आहे. या अँपचा प्रेम, सेक्स आणि मैत्री यासाठी मदत करणं हा उद्देश आहे. या अँपचे भारतात सध्या १३ लाख युजर्स आहेत.