देशांतर्गत उड्डाणांच्या भाड्यात वाढ, केंद्र सरकारकडून सामान्य जनतेला मोठा झटका

नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. पुरी यांनी सांगितलं, की विमान इंधनाच्या दरांमध्ये सतत वाढ होत असल्यानं ही गोष्ट लक्षात घेतचं देशांतर्गात उड्डाणांच्या भाड्यात पाच टक्के वाढ करण्यात आली आहे.

    नवी दिल्ली : महागाईनं हैराण झालेल्या सामान्य जनतेला आता आणखी एक मोठा झटका सरकारनं दिला आहे. शुक्रवारपासून देशांतर्गत उड्डाणांच्या (Domestic Flights) भाड्यामध्ये सरकारनं ५ टक्के वाढ केली आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. पुरी यांनी सांगितलं, की विमान इंधनाच्या दरांमध्ये सतत वाढ होत असल्यानं ही गोष्ट लक्षात घेतचं देशांतर्गात उड्डाणांच्या भाड्यात पाच टक्के वाढ करण्यात आली आहे.

    पुरी यांनी सांगितलं, की विमान प्रवासाच्या बहुतेक भाड्यामध्ये बदल केला गेला नाही. यापूर्वी एकच महिना आधी सरकारनं विमानांच्या किमान भाड्यातत १० टक्के आणि कमाल भाड्यात तीस टक्क्यांची वाढ केली होती. मागील वर्षी मे महिन्यात शेड्यूल देशांतर्गत उड्डाणे पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा करत देशांतर्गत विमानांच्या प्रवासाच्या कालावधीनुसार सात स्तरांमध्ये विभाजन केलं गेलं होतं.

    १ डिसेंबरनंरतर विमानाच्या इंधनाचे दर पाच वेळा वाढले आहेत. १ डिसेंबरला याचे दर ७.६ टक्क्यांनी म्हणजेच ३२८८.८८ रुपये प्रति किलोलीटरनं वाढले. १६ डिसेंबरला ६.३ टक्क्यांनी म्हणजेच २९४१.५ रुपये प्रति किलोलीटरनं वाढले.