भारताचा चीनला दणका, आयटीबीपीचा ‘ब्लॅक टॉप’वर ताबा

माहितीनुसार, आयटीबीपी जवान फुरचुक ला पासमधून जात असताना ब्लॅक टॉपवर पोहोचले. फुरचूक ला पास ४,९९४ मीटर उंचीवर आहे. आतापर्यंत आयटीबीपी फक्त पँगोंग तलावाच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर फिंगर २ आणि फिंगर ३ च्या जवळील धान सिंह पोस्टवर तैनात होती.

देश : पूर्व लडाख, येथील पँगोंग तलावाच्या प्रमुख शिखरावर भारतीय सैन्याच्या वर्चस्वानंतर कमीतकमी ३० इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) जवानांनी काही नवीन आणि महत्त्वपूर्ण ठिकानांवर ताबा मिळविला आहे. आयटीबीपी जवानांनी अत्यंत महत्त्वाच्या ब्लॅक टॉप क्षेत्राजवळील नवीन ठिकाणी रणनीतिकेने आपली स्थिती स्थापित केली. पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) तैनात केलेल्या चिनी सैन्याच्या कृती या आयटीबीपी जवानांच्या तावडीत असतील ही बाब भारताच्या या विशाल यशाचा अंदाज लावता येते.

ब्लॅक टॉपवरही भारताची

माहितीनुसार, आयटीबीपी जवान फुरचुक ला पासमधून जात असताना ब्लॅक टॉपवर पोहोचले. फुरचूक ला पास ४,९९४ मीटर उंचीवर आहे. आतापर्यंत आयटीबीपी फक्त पँगोंग तलावाच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर फिंगर २ आणि फिंगर ३ च्या जवळील धान सिंह पोस्टवर तैनात होती.

आयटीबीपीचे आयजी (ऑपरेशन्स) एम.एस. रावत म्हणाले, ‘आयटीबीपी डीजीपी एसएल देसवाल यांनी जवानांसमवेत गेल्या आठवड्यात सहा दिवस घालवले आणि त्यांना एलएसीवरील जबाबदाऱ्यांबाबत सतर्क केले. प्रथमच, आम्ही या शिखरावर मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. आयजी रावत यांनी डीजीपी देसवाल यांच्या सीमेवरही सहा दिवस घालवले. भारतीय जवानांनी हेलमेट टॉप, ब्लॅक टॉप आणि येलो बंपवर तटबंदी केली असून, या ठिकाणांवरुन चीनी सैनिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे.