भारत-चीन सीमेवर चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न; भारतीय जवानांकडून प्रत्युत्तर

भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याचे घुसखोरीचे मनसुबे उधळले गेले. लडाखमधल्या पँगोंग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्याजवळ भारत आणि चीनचे जवान भिडले. भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याला घुसखोरी करता आली नाही.

नवी दिल्ली: भारत आणि चीनमधील तणाव (india china border) कायम आहे. २९ आणि ३० ऑगस्टला चिनी सैन्याने पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जवानांनी (indian army) त्यांचा प्रयत्न उधळून लावला. यानंतर चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने (golobal times) भारताला उघड धमकी दिली आहे. भारताला आमच्याशी कोणतीही स्पर्धा करायची असल्यास त्यांना १९६२ पेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागेल, असा इशारा ग्लोबल टाईम्सने दिला आहे.

भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याचे घुसखोरीचे मनसुबे उधळले गेले. लडाखमधल्या पँगोंग सरोवरच्या दक्षिण किनाऱ्याजवळ भारत आणि चीनचे जवान भिडले. भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने चिनी सैन्याला घुसखोरी करता आली नाही. यानंतर चीन सरकारने पुन्हा एकदा बातचीत करून प्रश्न सोडवण्याची भाषा सुरू केली. तर चिनी सरकारच्या ग्लोबल टाईम्सने भारताला थेट धमकी दिली आहे.

‘भारतानं चिनी सैन्याला आधीच रोखले, असे भारताने म्हटले आहे. त्यामुळे भारतानेच आधी विध्वंसक पाऊल उचलले आणि संघर्षाची सुरुवात केली, हे स्पष्ट आहे. भारतामध्ये अनेक समस्या आहेत. रविवारी भारतात ७८ हजार कोरोना (corona) रुग्ण आढळले. त्यांच्या अर्थव्यवस्थे (indian economy) ची स्थिती वाईट आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील तणाव वाढवून भारत देशातील समस्यांवरून लक्ष विचलित करू पाहतोय,’ असे ग्लोबल टाईम्सने संपादकीय लेखात म्हटले आहे.

पीपल्स लिबरेशन आर्मी देशाच्या इंचनइंच जमिनीचे संरक्षण करण्यास सज्ज आहे. भारत एका सामर्थ्यशाली चीनचा सामना करतोय, हे त्यांनी लक्षात ठेवावे. आमच्याकडे पुरेसे सैन्य आहे. चीन भारताला संघषार्साठी चिथावणी देत नाही. मात्र आम्ही आमच्या जमिनीवर अतिक्रमण होऊ देणार नाही. चिनी जनता सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.