lav agrwal

देशात ३ मे रोजी (Corona Patients in India) १७.१३ टक्के रुग्ण होते. आता हा आकडा ११.१२ टक्क्यांवर आला आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही ८७.७६ टक्क्यांवर पोहोचलं आहे.

    देशात गेल्या २४ तासांमध्ये २.५७ लाख कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद झाली आहे. मागच्या २० दिवसांची आकडेवारी पाहिली तर कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,३ मे रोजी देशात(Corona Patients in India) १७.१३ टक्के रुग्ण होते. आता हा आकडा ११.१२ टक्क्यांवर आला आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही ८७.७६ टक्क्यांवर पोहोचलं आहे. देशात आतापर्यंत २ कोटी ३० लाखांहून अधिक जण बरे झाले आहेत. तर मागच्या २४ तासात ४ हजार १९४ जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि दिल्लीत सर्वाधिक करोना मृत्यू झाल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं आहे.

    देशात ८ राज्यात १ लाखाहून अधिक सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.  तसेच ८ राज्यांमध्ये ५० हजार ते १ लाखादरम्यान करोना रुग्ण सक्रीय आहेत. तर २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ५० हजारांहून कमी रुग्ण असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. देशातील ७८ टक्के नवे रुग्ण हे १० राज्यांमध्ये आहेत. त्यापैकी ७ राज्यात प्रतिदिन १० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.

    १८ राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची टक्केवारी १५ टक्के आहे. तर १४ राज्यांमध्ये करोनाबाधितांची टक्केवारी ५ ते १५ टक्क्यांदरम्यान आहे. तर ४ राज्यांमध्ये कोरोना बाधितांची टक्केवारी ५ टक्क्यांच्या खाली आहे