Foreign Minister S Jaishankar

पूर्व लद्दाखमध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) सैन्य तैनात करण्याचा मुद्दा भारतीय शिष्टमंडळाने उपस्थित केला. यावेळी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाच कलमी करार केला, जो पूर्व लडाखमधील सीमेवरील गतिरोध सोडविण्यात दोन्ही देशांना मार्गदर्शन करेल.

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) चीनने मोठ्या संख्येने सैन्य आणि सैन्य उपकरणे तैनात केल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S.Jaishankar) आणि चीनचे पंतप्रधान वांग यी (Wang Yi) मॉस्को येथे झालेल्या बैठकीत चिंता व्यक्त केली आहे. अशी सरकारी सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली.


पूर्व लद्दाखमध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) सैन्य तैनात करण्याचा मुद्दा भारतीय शिष्टमंडळाने उपस्थित केला. यावेळी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाच कलमी करार केला, जो पूर्व लडाखमधील सीमेवरील गतिरोध सोडविण्यात दोन्ही देशांना मार्गदर्शन करेल. गुरुवारी मॉस्कोमधील बैठक अडीच तास चालली. जयशंकर आणि वांग शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी रशियाच्या राजधानीत होते.

भारत-चीनदरम्यान 

आपापसातील मतभेदांचं वादात रुपांतर होऊ दिलं जाणार नाही

दोन्ही देशांचं सैन्य विवादित क्षेत्रातू वापस घ्यावं

निश्चित केलेल्या नियमांनुसार दोन्ही देशांमधील बातचीत सुरु ठेवावी

सध्याच्या संधी आणि प्रोटोकॉल्स दोन्ही देश मानणार

दोन्ही देश असं कुठलंही पाऊल उचलणार नाही ज्याने तणाव वाढेल