कोरोना रुग्णांच्या संख्येत भारताने ब्राझीलला टाकले मागे

भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांचा आकडा ४० लाखांच्या वर गेला आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत भारताने आता ब्राझीललाही मागे टाकले आहे. त्यामुळे भारत जगात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

 नवी दिल्ली: संपूर्ण भारतात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढत होत आहे. भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांचा आकडा ४० लाखांच्या वर गेला आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत भारताने आता ब्राझीललाही मागे टाकले आहे. त्यामुळे भारत जगात कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. देशात कोरोना एकूण बाधितांची संख्या ४१ लाख १३ हजार इतकी झाली आहे. त्यामध्ये आतापर्यंत ७० हजार ६२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे तिप्पटीहून जास्त आहे.

अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा हा ६२ लाखांच्या पार पोहोचला आहे. तर १ लाख ८७ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे २२ लाख ८३ हजार लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४० लाख २३ हजार १७९ वर पोहोचली आहे. आजवर ६९,५६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात शनिवारी आजवर सर्वाधिक ८६,४३२ प्रकरणं समोर आली आहेत.

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत जरी वाढ होत असली तरी मृत्यूदरात मात्र सातत्याने घट होताना दिसतेय. देशातील कोरोनाचा मृत्यू दर आता १.७२ टक्के इतका आहे. दरम्यान, ब्राझीलमध्ये ३४ लाखांहून अधिक लोक आजवर बरे झाले आहेत. तर ५ लाखांहून अधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. शनिवारी रात्री राज्यांकडून आलेल्या आकडेवारीनंतर भारताने ब्राझिलला मागे टाकल्याचे समोर आले.