कोरोना रूग्णांच्या रिकव्हरी रेटमध्ये भारताने अमेरिकेलाही टाकलं मागे

देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा (Recovery Rate) दर वाढला आहे. भारतातील (India) रुग्ण बरे होण्याचा दर हा आता अमेरिकेपेक्षाही (America) अधिक झाला असून भारत पहिल्या क्रमांकावर (First Rank) पोहोचला आहे. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

संपूर्ण जगभरासह देशात कोरोना विषाणूचा (Corona Virus) प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. तसेच देशात दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशातील कोरोना रूग्णांचा एकूण संख्या ५३ लाखांच्या वर गेली आहे. सध्या देशात गेल्या २४ तासांमध्ये ९३ हजारापेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. तर ९५ हजार ८८५ रूग्ण कोरोनामुक्त (Discharge) झाले आहेत. देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा (Recovery Rate) दर वाढला आहे. भारतातील (India) रुग्ण बरे होण्याचा दर हा आता अमेरिकेपेक्षाही (America) अधिक झाला असून भारत पहिल्या क्रमांकावर (First Rank) पोहोचला आहे. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

जागतिक स्तरावर सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. जगभरातील एकूण रुग्णांपैकी १७ टक्के रुग्ण एकट्या भारतामध्ये आहेत. मात्र देशातील रिकव्हरी रेट (Recovery Rate) ७९.२८ असून हे प्रमाण जगभरातील इतर देशांच्या तुलनेत अव्वल आहे. आरोग्य मंत्रालयाने याचं श्रेय केंद्र सरकारला (Central Government) देत रणनीती, ठोस उपाययोजनांसाठी चाचण्या, सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णांची ओळख, ट्रॅकिंग आणि देखरेखीसाठी उचललेली पावलं यामुळे हे शक्य झाल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, सप्टेंबर (September) महिन्यात आतापर्यंत देशात १६ लाख ८६ हजार ७६९ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २१ हजार १५० रूग्णांनी जीव गमावला आहे. गेल्या काही दिवसात दररोज ९० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. देशातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर (death rate)  हा १.६१ टक्के आहे. तर सकारात्मकता दर १०.५८ टक्के इतका असल्याची माहिती समोर आली आहे.