चीनला शह देण्यासाठी भारताने म्यानमारला दिला मोठा प्रस्ताव

चीन म्यानमारसोबत (China-Myanmar ) ऊर्जा सहकार्य संबंध बळकट करत असतानाच, भारताने (India) चीनला शह देण्यासाठी रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या क्षेत्रात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या दृष्टीनेच भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला आणि लष्करप्रमुख एमएम नरवणे यांचा म्यानमार दौरा महत्त्वाचा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात भारत आणि म्यानमारमध्ये पेट्रोलियम रिफायनरी उभारण्यासंबंधात चर्चा झाली. म्यानमारमध्ये उभारण्यात येणाऱ्या या पेट्रोलियम रिफायनरीत सहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येईल. यंगून जवळ थानलिन भागात भारताने पेट्रोलियम रिफायनरी उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच आतापर्यंत इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने या प्रकल्पात रस दाखवला असून, दोन्ही देशांसाठी हा प्रकल्प फायद्याचा आहे, असे सांगतिले जात आहे.

हर्ष श्रृंगला आणि लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी म्यानमारच्या राष्ट्रीय नेत्या आँग सॅन स्यू की आणि डिफेंस सर्व्हीसचे कमांडर इन चीफ जनरल मिन आँग यांची भेट घेतली. दोन्ही पक्षांमध्ये सीमा भागात सुरक्षा आणि स्थिरता कायम ठेवण्याबद्दल चर्चा झाली आहे.