२०२२ संपेपर्यंत १०० कोटी लसींंची निर्मिती, QUAD सोबत चर्चा सुरु, लसनिर्मितीची क्षमता वाढणार

भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा क्वाड हा गट आहे. लसींची निर्मिती आणि उत्पादन याबाबत या चार देशांमध्ये करार होण्याची शक्यता असून त्याबाबतची बोलणी सुरु असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र खात्यानं दिलीय. २०२२ च्या अखेरपर्यंत लसींची निर्मिती १०० कोटींनी वाढवणं, हा यामागचा उद्देश असल्याचं परराष्ट्र खात्यानं दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलंय. लसनिर्मिती करण्याच्या आपल्या क्षमतेचा भारत उपयोग करेल, असं सरकारनं म्हटलंय. 

    भारतात लसीकरणाचं नियोजन चुकल्याचा फटका कोट्यवधी नागरिक सध्या सहन करत आहेत. लसींची नोंदणीच न करणं, लसीकरणाबाबत सतत धोरण बदलत राहणं आणि देशातील लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प लसींची उपलब्धता या समस्यांमुळे लसीकरण मोहिमेच्या वेगाला खिळ बसली. त्यानंतर सरकारनं लसींची उपलब्धता वाढवण्यासाठी हालचाली सुरु केल्या असून आता QUAD सोबत (Quadrilateral Security Dialouge) याबाबत करार होण्याची शक्यता आहे.

    भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा क्वाड हा गट आहे. लसींची निर्मिती आणि उत्पादन याबाबत या चार देशांमध्ये करार होण्याची शक्यता असून त्याबाबतची बोलणी सुरु असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र खात्यानं दिलीय. २०२२ च्या अखेरपर्यंत लसींची निर्मिती १०० कोटींनी वाढवणं, हा यामागचा उद्देश असल्याचं परराष्ट्र खात्यानं दिलेल्या लेखी उत्तरात म्हटलंय. लसनिर्मिती करण्याच्या आपल्या क्षमतेचा भारत उपयोग करेल, असं सरकारनं म्हटलंय.

    भारताकडे असणारी लसींचं उत्पादन करण्याची क्षमता वापरून इतर देशांकडून आर्थिक साहाय्य आणि गुंतवणुकीच्या जोरावर लसींचं उत्पादन वाढवलं जाऊ शकतं, असं सरकारला वाटतंय. जगातील अनेक देशांना असणारी लसींची गरज लक्षात घेऊन क्वाडमार्फत लसींच्या निर्मितीबाबत काही ठोस धोरण आखलं जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भारत लसनिर्माता म्हणून मोठी भूमिका बजावू शकतो.

    याबाबत सध्या प्राथमिक बोलणी सुरू असून लवकरच याबातचे अधिक तपशील जाहीर केले जातील, असं सांगण्यात आलंय.