चीनची भूमिका कायम राहिल्यास भारताला सामना करावा लागेल – एस. जयशंकर

  • भारत-चीनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच चीन आणि भारताच्या लष्करी बैठकीत ठरल्याप्रमाणे चीन करताना दिसत नाही आहे. चीन मागे हटण्यास तयार नाही. चीनने हीच भूमिका कायम ठेवल्यास भारतालाही त्यांचा सामना करावा लागेल. यासाठी भारताला केव्हाही सामन्यासाठी तयारी ठेवावी लागेल. असे जयशंकर म्हणाले आहेत. लष्करी बैठकीत पेगाँग सरोवर हा आमचा भाग आहे.

लडाख : लडाखच्या सुरक्षा रेषा सीमेवरुन भारत-चीनमध्ये तणावाचे वातारण निर्माण झाले आहे. तसेच लष्कराच्या चर्चेत ठरल्याप्रमाणे चीन सुरक्षा रेषेवरुन मागे हटण्यास तयार नाही आहे. चीनने अशीच भूमिका ठेवल्यास भारतालाही कारवाई करावी लागेल. असे संकेत भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिले आहेत. चीनसोबत आज पाचवी लष्करी चर्चा होणार होती. त्या पूर्वी जयशंकर यांनी हे संकेत दिले आहेत. 

भारत-चीनमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच चीन आणि भारताच्या लष्करी बैठकीत ठरल्याप्रमाणे चीन करताना दिसत नाही आहे. चीन मागे हटण्यास तयार नाही. चीनने हीच भूमिका कायम ठेवल्यास भारतालाही त्यांचा सामना करावा लागेल. यासाठी भारताला केव्हाही सामन्यासाठी तयारी ठेवावी लागेल. असे जयशंकर म्हणाले आहेत. लष्करी बैठकीत पेगाँग सरोवर हा आमचा भाग आहे. असे म्हणत आम्ही मागे हटणार नाही असे चीनचे परराष्ट्र मंत्री म्हटले होते. त्यामुळे चीन मागे हटत नाही आहे. उलट जास्तच कुरघोड्या करत आहे. त्यामुळे चीन-भारत सीमेवरील वातावरण चिघळले आहे. 

भारत-चीन यांच्या तणावामुळे व्यापर आणि आर्थिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. तसेच चीन पाठी हटायला तयार नाही. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी भारताला सामना करावा लागेल असे संकेत देऊन भारताची बाजू देखील मांडली आहे. आज रविवारी भारत-चीन मध्ये पाचवी लष्करी बैठक होणार होती त्यापुर्वी त्यांनी भारताला संकेत दिले आहेत.