पंजाबमध्ये भारतीय वायुसेनेचं फायटर जेट जेट मिग-२१ बिसॉन कोसळलं ; या अपघातात पायलट अभिनव चौधरी यांचा मृत्यू

राजस्थानातील हलवारामधून सूरतगडकडे जाताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोरआली आहे. हलवारामधून सूरतगडसाठी उड्डाण केलेलं विमान अचानक कोसळल्यानं ही दुर्देवी घटना घडली आहे.

    चंदीगड: भारतीय वायुसेनेचे एक फायटर जेट पंजाबमधील लंगियाना खुर्द या गावात कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. फायटर जेट मिग-21 बिसॉन असं( MiG-21 Bison) या विमानाचं नाव आहे. या विमान अपघातात पायलट अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला (Pilot Abhinav Chaudhary died )असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच भारतीय वायूसेनेने एक टीम घटनास्थळी पाठवली आहे. या टीमने शोधमोहीम केल्यानंतर पायलट अभिनव यांचा मृतदेह सापडला आहे.

    राजस्थानातील हलवारामधून सूरतगडकडे जाताना ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोरआली आहे. हलवारामधून सूरतगडसाठी उड्डाण केलेलं विमान अचानक कोसळल्यानं ही दुर्देवी घटना घडली आहे. वायू सेनेच्या अधिकाऱ्यांनी दुर्घटनेचं नेमके कारण शोधण्याचे आदेश दिले आहेत. मागच्या वर्षातही मिग-21 हे एक वायुदलाचं विमान कोसळलं होतं.