फिचच्या अहवालामुळे भारतीयांच्या चिंतेच वाढ

भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात एक वाईट बातमी आहे. जागतिक पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्स’ ने भारतासमोरचे आर्थिक संकट जास्त काळ राहणार असल्याचे सांगितले आहे. फिचने आज जाहीर केलेल्या अहवालामध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये १०.५ टक्क्यांची घट दिसून येईल, असे म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका बसला असल्याचे एनएसओने गेल्या आठवड्यामध्ये सांगितले होते. त्यानंतर ही बातमी समोर आली आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये एप्रिल ते जून २०२० या तिमाहीमध्ये २३.९ टक्क्यांनी घट झाली आहे. सलग २ तिमाही जीडीपीमध्ये घट दिसून आली. जुलै ते सप्टेंबर या काळातही ही घट कायम राहण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती असताना फिचने भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत भाकीत करून चिंतेत भर टाकली आहे.

फिचने आपल्या अहवालामध्ये म्हटले आही की, भारताचा जीडीपी ऑक्टोबर – डिसेंबर या तिमाहीत उसळी घेईल. अनेक व्यवहार सुरळीत होईतल. मात्र सध्याच्या आर्थिक फटक्यातून सावरताना अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग संथ आणि असमान राहील, असे फिचने म्हटले आहे. भारताचा जीडीपी उणे १०.५ टक्क्यांपर्यंत राहणार असल्याचा अंदाज फिचने वर्तवला आहे. ग्लोबल इकॉनॉमिक आऊटलूकच्या जूनमधील अंदाजापेक्षा ५ टक्के अधिक घट दिसेल, असेही फिचचे म्हणणे आहे.