women in indian army

भारतीय लष्करात(Indian Army) २६ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांच्या कर्नल (टाइम स्केल) पदावर आता पदोन्नती(Colonel Rank To Women Officers) देण्यास मान्यता आली आहे.

    निवड मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय लष्करात(Indian Army) २६ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांच्या कर्नल (टाइम स्केल) पदावर आता पदोन्नती(Colonel Rank To Women Officers) देण्यास मान्यता आली आहे. कॉर्प्स ऑफ सिग्नल, इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल इंजिनीअर्स (ईएमई), कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्समध्ये सेवा देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर मान्यता देण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी कर्नल पदावर पदोन्नती केवळ आर्मी मेडिकल कॉर्प्स (एएमसी), जज ॲडव्होकेट जनरल (जेएजी) आणि आर्मी एज्युकेशन कोर (एईसी) मधील महिला अधिकाऱ्यांना देण्यात येत होती.

    पाच महिला अधिकारी कोण ?

    भारतीय लष्कराच्या विविध शाखांमध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी पदोन्नतीचे मार्ग वाढवून लष्करात त्यांच्यासाठी संधी वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.कर्नल पदासाठी निवडलेल्या पाच महिला अधिकाऱ्यांमध्ये सिग्नल कॉर्प्समधून लेफ्टनंट कर्नल संगीता सरदाना, ईएमई कॉर्प्समधून लेफ्टनंट कर्नल सोनी आनंद आणि लेफ्टनंट कर्नल नवनीत दुग्गल आणि कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समधून लेफ्टनंट कर्नल रीनु खन्ना आणि लेफ्टनंट कर्नल रिचा सागर यांचा समावेश आहे.