indian army destroy pakistan post in poonch jammu kashmir
भारतीय सैन्याची मोठी कारवाई, पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी पोस्ट केल्या उद्ध्वस्त

पाकिस्तान (Pakistan) सातत्याने नियंत्रण रेषेवर (LOC) शस्त्रसंधीचे उल्लंघन (Ceasefire) करत होता. यावेळी भारतीय लष्कराने (Indian Army) मोठी कारवाई करत थेट पाकिस्तानच्या पोस्ट (posts) उद्ध्वस्त केल्या.

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने पाकिस्तानी पोस्टवर हल्ला करत चोख उत्तर दिलं आहे. जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी पोस्ट भारतीय सैन्याकडून उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. पाकिस्तान सातत्याने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत होता. यावेळी भारतीय लष्कराने मोठी कारवाई करत थेट पाकिस्तानच्या पोस्ट उद्ध्वस्त केल्या.

पाकिस्तानकडून राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन Indian Army Destroy Pakistan Post in Poonch Jammu Kashmir

रविवारी संध्याकाळी पुन्हा एकदा पाकिस्तानने शस्त्रसंधींचं उल्लंघन केलं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये राजौरी इथं असलेल्या भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तान सैन्याकडून लहान शस्त्रे आणि तोफांचा वापर केला. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल देवेंद्र आनंद म्हणाले की, संध्याकाळी ६.४५ च्या सुमारास पाकिस्तानने राजौरीच्या सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर शस्त्रे आणि तोफांचा गोळीबार केला. यानंतर भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले आहे.

याआधीही पाकिस्तानने पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेखालील खारी करमारा आणि देवगड या भागात शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं होतं. शनिवारी पाकिस्तानकडून पुंछ जिल्ह्यात गोळीबार करण्यात आला आहे. ज्यामझ्ये बीएसएफचे २ सैनिक आणि १ महिला जखमी झाल्याची माहिती देण्यात आली होती. यावेळी पुंछच्या मनकोट, मेंधर आणि खारी करमारा सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला.

दरम्यान, या वर्षाच्या सुरूवातीपासूनच पाकिस्तानने आतापर्यंत नियंत्रण रेषेवरील ३,१९० वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. यामध्ये २४ नागरिक ठार झाले असून १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.