indian army

श्रीनगर: उत्तर काश्मीरमध्ये आज भारताच्या लष्कराने राज्य पोलिसांसोबत संयुक्त कारवाई केली. यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे भारतात मोठा कट रचण्याचे मनसुबे उधळून लावण्यात आले. दहशतवादी किशन गंगा नदीमार्गे पाकव्याप्त काश्मीरमधून शस्त्रांची तस्करी(weapon smuggle by pakistan via river) करण्याच्या प्रयत्नात होते. याची माहिती मिळताच लष्कराने जम्मू काश्मीर पोलिसांसोबत संयुक्त मोहिम राबवली आणि दहशतवाद्यांची शस्त्रे जप्त केली(Indian army seized weapons). जीओसी चिनार कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांनी ही माहिती दिली.

श्रीनगर: उत्तर काश्मीरमध्ये आज भारताच्या लष्कराने राज्य पोलिसांसोबत संयुक्त कारवाई केली. यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे भारतात मोठा कट रचण्याचे मनसुबे उधळून लावण्यात आले. दहशतवादी किशन गंगा नदीमार्गे पाकव्याप्त काश्मीरमधून शस्त्रांची तस्करी(weapon smuggle by pakistan via river) करण्याच्या प्रयत्नात होते. याची माहिती मिळताच लष्कराने जम्मू काश्मीर पोलिसांसोबत संयुक्त मोहीम राबवली आणि दहशतवाद्यांची शस्त्रे जप्त केली(Indian army seized weapons). जीओसी चिनार कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांनी ही माहिती दिली. सर्व्हिलन्स डिव्हाइसचा वापर करत लष्कराने पाकिस्तानकडून तस्करी करण्यात येत असलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. पाकिस्तानकडून अजुनही कुरापती सुरुच असल्याचे दिसते. पुढच्या काही दिवसात त्यांच्या कारवाया रोखण्यासाठी सज्ज राहू असेही बीएस राजू यांनी सांगितले.

सीमापार ३०० लाँच पॅड

पाकिस्तानच्या बाजूने जवळपास २५० ते ३०० दहशतवाद्यांचे लाँच पॅड असल्याची माहिती लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांनी दिली. दहशतवाद्यांकडून सातत्याने घुसखोरीचा प्रयत्न केला जात असला तरी त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आम्ही समर्थ असल्याचे लेफ्टनंट राजू यांनी सांगितले. दोन ते तीन दहशतवादी नदी किनाऱ्यावर दोराने बांधलेल्या ट्यूबमध्ये काही वस्तूंची वाहतूक करण्याचा प्रयत्नात होते. त्याचवेळी सैन्यदलाचे जवान तेथे दाखल झाले आणि त्यांनी शस्त्रास्त्रे जप्त केली. या कारवाईत दहशतवाद्यांकडून ४ एके ७४ रायफल, ८ मॅग्झीन्स आणि २३० एके रायफली जप्त करण्यात आल्या.