पुलवामामध्ये लष्कराच्या कारवाईला यश, लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरला कंठस्नान – तीन दहशतवादी ठार

पुलवामा येथे तीन दहशतवाद्यांना(3 Terrorists Killed) ठार करण्यात आलं आहे. दक्षिण काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईत सुरक्षा जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा केला आहे.

    जम्मू काश्मीरमधील(Jammu Kashmir) पुलवामा येथे तीन दहशतवाद्यांना(3 Terrorists Killed) ठार करण्यात आलं आहे. दक्षिण काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईत सुरक्षा जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरचा खात्मा केला आहे. काश्मीर पोलिसांनी(Kashmir Police) दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा जवानांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा आणि काही सामग्री जप्त करण्यात आली आहे.

    ठार करण्यात आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरची ओळख पटली असून एजाज उर्फ अबु हुरैरा असं नाव आहे. तर इतर दोन दहशतवादी स्थानिक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    सध्या सर्च ऑपरेशन सुरु आहे. पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखील पोलीस दलाला दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर संयुक्त कारवाई करत परिसर सील केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली होती. यावेळी तीन दहशतवादी ठार करण्यात आले. यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर एजाज उर्फ अबु हुरैरा याचाही समावेश आहे. दरम्यान चकमकीनंतर पुलवामा शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.