भारतीय लष्कराने केला पूंछमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा

“सोमवारी पहाटे नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांनी पुंछ सेक्टरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. सतर्क जवानांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यावर, दहशतवाद्यांनी गोळीबार केला. बचाव म्हणून लष्कराकडून देखील फायरींग करण्यात आली. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. त्याच्याकडून एके -47 रायफल जप्त करण्यात आली असून परिसरात अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे.”

    जम्मू -काश्मीरच्या पूंछमध्ये घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. दहशतवादी आणि लष्कर यांच्यात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला आहे. या दहशतवाद्याचा मृतदेह लष्कराने ताब्यात घेतला आहे. या संदर्भातील माहिती लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिली आहे.

    लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद म्हणाले की, “सोमवारी पहाटे नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांनी पुंछ सेक्टरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. सतर्क जवानांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यावर, दहशतवाद्यांनी गोळीबार केला. बचाव म्हणून लष्कराकडून देखील फायरींग करण्यात आली. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. त्याच्याकडून एके -47 रायफल जप्त करण्यात आली असून परिसरात अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे.”

    तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यानंतर जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादाचा धोका वाढला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या 38 दहशतवाद्यांनी तालिबानी दहशतवाद्यांकडून प्रशिक्षण घेतल्याची माहिती मिळाली आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करण्याबरोबरच, माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतलेले हे भयानक दहशतवादी आठवड्यापूर्वी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) च्या हजीरा येथे स्थित जैशच्या प्रशिक्षण शिबिरात पोहोचले आहेत. त्यामुळे पुंछच्या चक्कन दा बागेसमोर हजीरा कॅम्पमध्ये हालचाली तीव्र करण्याच्या सूचनाही आहेत.

    पुंछचा परिसर सीमापार दहशतवादासाठी अत्यंत संवेदनशील आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटली, हजीरा, बाग आणि इतर काही भागात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण शिबिर येथे सुरू आहे. या जिल्ह्यातून नियंत्रण रेषेवर 20 हून अधिक लॉन्चिंग पॅड्स सक्रिय असल्याची माहिती आहे. प्रत्येक लाँच पॅडवर 10-12 दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी तयार ठेवण्यात आले आहे.

    भौगोलिक परिस्थितीमुळे पुंछच्या नियंत्रण रेषेला लागून असलेला परिसर अतिशय संवेदनशील आहे. गुलपूर, सालोत्री, चक्कन दा बाग इत्यादी भागातून घनदाट जंगलातून घुसखोरी करणे सोपे आहे. 2002 च्या सुमारास अफगाणिस्तान आणि सुदानच्या दहशतवाद्यांची पुंछ परिसरात उपस्थिती होती.