चीन आणि पाकिस्तान एकत्र करू शकतात हल्ला, १५ दिवसांच्या युद्धासाठी भारताकडूनही जय्यद तयारी

युद्धासाठी आवश्यक सामुग्री तातडीनं खरेदी करण्यासाठीदेखील निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती मिळतेय. अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि इतर सामुग्रीसाठी ५० हजार कोटी रुपये खर्च करण्याची मुभा सैन्यदलाला देण्यात आल्याचंही समजतंय. शस्त्रं आणि दारुगोळा यांचा दहा दिवस पुरेल, इतका साठा करण्याची सध्या परवानगी होती. मात्र आता १५ दिवस पुरेल, इतक्या शस्त्रसाठ्याची परवानगी देण्यात आलीय.

चीनसोबत भारताचा तणाव दिवसेंदिवस वाढत चालला असून युद्धजन्य परिस्थितीकडं वाटचाल सुरू असल्याची माहिती मिळतेय. या पार्श्वभूमीवर युद्धाला तोंड फुटलंच तर १५ दिवस पुरेल, एवढा शस्त्रसाठा जमा करून ठेवण्याचे आणि युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश सैन्याला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

युद्धासाठी आवश्यक सामुग्री तातडीनं खरेदी करण्यासाठीदेखील निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती मिळतेय. अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि इतर सामुग्रीसाठी ५० हजार कोटी रुपये खर्च करण्याची मुभा सैन्यदलाला देण्यात आल्याचंही समजतंय. शस्त्रं आणि दारुगोळा यांचा दहा दिवस पुरेल, इतका साठा करण्याची सध्या परवानगी होती. मात्र आता १५ दिवस पुरेल, इतक्या शस्त्रसाठ्याची परवानगी देण्यात आलीय.

दारुगोळा आणि शस्त्रसाठा यांची साठवणूक करण्याची मर्यादा वाढवण्याचं कारण म्हणजे चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून एकाच वेळी आगळीक होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यापूर्वी युद्धाची शक्यता लक्षात घेऊन ४० दिवस पुरेल, एवढा साठा कऱण्याची परवानगी दिली जात असे. मात्र आता आधुनिक गरजा आणि सोयी लक्षात घेता, ही मुदत १० दिवसांपर्यंत आणण्यात आली होती.

उरी हल्ल्यानंतर आपल्याकडील रिझर्व्ह शस्त्रसाठा मर्यादित असल्याची बाब लक्षात आली होती. त्यानंतर तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांना असणारी शस्त्रखरेदीची मर्यादा १०० कोटींवरून ५०० कोटी केली होती. ही मर्यादा वाढल्यानं शस्त्रसाठा वाढत गेला आणि युद्धाच्या परिस्थितीत भारताची सज्जता वाढली, असं सांगितलं जातं.