WORK FROM HOME

कोविड-१९ मुळे वाढलेला कामाचा दबाव आणि खासगी जीवन यामुळे भारतीय कर्मचारी दुविधेत असून त्यांच्यावर आता कामाचा दबाव वाढलेला आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. मायक्रोसॉफ्टच्या नव्या वर्क इंडेक्सनुसार भारतात २९ टक्के कर्मचाऱ्यांवर कामाचा दबाव असून आशियातील ही सर्वाधिक दुसरी मोठी आकडेवारी असल्याचे म्हटले आहे.

दिल्ली: कोविड-१९ मुळे वाढलेला कामाचा दबाव(work pressure) आणि खासगी जीवन(effect on personal life) यामुळे भारतीय कर्मचारी दुविधेत असून त्यांच्यावर आता कामाचा दबाव वाढलेला आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. मायक्रोसॉफ्टच्या नव्या वर्क इंडेक्सनुसार भारतात २९ टक्के कर्मचाऱ्यांवर कामाचा दबाव(indians working under pressure) असून आशियातील ही सर्वाधिक दुसरी मोठी आकडेवारी असल्याचे म्हटले आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने एक सर्वेक्षण केले होते. त्यात सहा हजार काम करणाऱ्या नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. हे सर्वेक्षण आठ देशांमध्ये करण्यात आले.

अहवालानुसार, ४१ टक्केपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना काम आणि खासगी जीवन यातच फरकच न राहिल्याने अधिक दबावाचा सामना करावा लागत असल्याची कबुली दिली. गेल्या सहा महिन्यात कोविड- १९ मुळे प्रत्येक ठिकाणी रिमोट युगाची निर्मिती झाली आणि भौतिकतेऐवजी आभासी जगतात राहणाऱ्या व्यक्तीपर्यंत नवे कार्यस्थळ निर्माण झाले अशी प्रतिक्रिया मायक्रोसॉफ्टचे अधिकारी समिक रॉय म्हणाले.

अहवालातील आकडेवारीनुसार, २९ टक्के कर्मचाऱ्यांनी नव्या वातावरणात काम करावे लागत असल्याची कबुली दिली.
आता त्यांना पूर्वीच्या तुलनेत एक तास अधिक काम करावे लागत असल्याचेही या कर्मचाऱ्यांनी सांगितले. तथापि जर्मनीच्या कर्मचाऱ्यांनी मात्र नव्या परिस्थितीनुसार पूर्वीच्या तुलनेत अत्यंत कमी स्वरुपात परिवर्तन झाल्याचे मत व्यक्त केले. आकडेवारीनुसार जागतिक स्तरावरील कर्मचारी पूर्वीच्या तुलनेत अधिक बैठकांमध्ये भाग घेत असून ते अधिक ऑर्डरवर काम करीत आहेत आणि व्हर्च्युअल चर्चासत्रांमध्येही भाग घेत आहेत.