indian Idli war on twitter with Edward Anderson
गरमागरम इडली (Idli) विथ एडवर्ड अँडरसन On Twitter

  • असं घडलं 'अँडरसन' ईडली पुराण

इडली नावाच्या साध्या सरळ पदार्थानं ट्विटरवर पार धमाल उडवून दिलीय… अगदी अमेरिकेच्या निवडणुकीपर्यंत आपली इडली पोहोचलीय. हे इडली पुराण सुरू झालं ते एका फूड साईटनं विचारलेल्या प्रश्नामुळे… असा कुठला पदार्थ आहे, जो लोकांना उगाचच आवडतो? असा तो प्रश्न होता. अमेरिकेतल्या नॉर्थ अमब्रिया विद्यापीठातले इतिहासाचे प्राध्यापक एडवर्ड अँडरसन म्हणाले “इडली हा जगातला सगळ्यात बोअरिंग पदार्थ आहे”.

 

दक्षिण भारतीय आणि ईडलीप्रेमी  Idli On Twitter

अँडरसन यांच्या या ट्विटनंतर दक्षिण भारतीय लोकांनी आणि इडलीप्रेमींनी अँडरसन यांना आडवंच घेतलं. एकदा लाल मिरची घातलेल्या नारळाच्या चटणीसोबत इडली खाऊन तर पाहा इथपासून कानडी पद्धतीचं सांबार की तामिळी पद्धतीचं इथपर्यंत इडलीवर गरमागरम चर्चा रंगल्या. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही इडली पुराणात उडी घेतली. “संस्कृती स्वीकारणं हे कठीण असतं. एखादी क्रिकेट मँच मस्तपैकी पाहणं, आणि चवीनं इडली खाता येणं हे काही जणांच्याच भाग्यात लिहिलेलं असतं. जाऊ दे, सोडून द्या या बिचाऱ्या माणसाला, जगणं किती मस्त आहे, याची कल्पना त्याला नाही, असं ट्विट शशी थरुर यांनी केलं.

 

असा झाला ट्विटर पुराणाचा अंत Prof Edward Anderson

अखेर या टिवटिवाटावर उत्तर म्हणून अँडरसन यांनी जेवणासाठी इडली सांबार ऑर्डर केलं आणि त्याचा फोटोही ट्विटरवर शेअर केला. दरम्यान इडलीची इंग्लंडमधून सुरू झालेली ही गोष्ट व्हाया भारत अमेरिकेच्या निवडणुकांपर्यंत पोहोचली…. डेमोक्रँटिक पक्षाच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनीही त्यांची आई त्यांना इडली खायला द्यायची, अशी आठवण सांगितली.