Indian navy

भारतीय नौदलाने(Indian navy) ड्रोन विरोधी शस्त्र असलेल्या ‘स्मॅश २०० प्लस’(smash 200 plus) या सिस्टिमसाठी इस्रायलकडे ऑर्डर दिली आहे. स्मॅश २०० प्लस’ सिस्टिम’ बंदुक किंवा मशीन गनवर बसवता येईल. पुढच्या वर्षीपासून याचा पुरवठा सुरु होईल. 

भारतीय नौदलाने(Indian navy) ड्रोन विरोधी शस्त्र असलेल्या ‘स्मॅश २०० प्लस’(smash 200 plus) या सिस्टिमसाठी इस्रायलकडे ऑर्डर दिली आहे. या सिस्टिमद्वारे शत्रुंची छोटी ड्रोन्स पाडता येतील. ‘स्मॅश २०० प्लस’ ही एक कॉम्प्युटराइज्ड फायर कंट्रोल आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक साइट सिस्टिम आहे.

‘स्मॅश २०० प्लस’ सिस्टिम’ बंदुक किंवा मशीन गनवर बसवता येईल. पुढच्या वर्षीपासून याचा पुरवठा सुरु होईल.  बंदुक किंवा मशीन गनवर ही सिस्टिम बसवून १२० मीटर अंतरावरुन वेगाने लक्ष्याच्या दिशेने येणारी छोटी ड्रोन्स हवेतच नष्ट करता येणे शक्य होते.

भारत इस्रायलकडून ही सिस्टिम विकत घेणार आहे. मात्र अशा पद्धतीचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याचाही भारताचा प्रयत्न करत आहे. भारत अमेरिकेसोबत मिळून छोटी एरियल सिस्टम ड्रोन स्वार्म तसेच ड्रोन्स विरोधी सिस्टिम विकसित करणार आहे.