chota rajan

कानपूरच्या टपाल विभागाने अंडरवर्ल्ड डॉन माफियाचा फोटो पोस्टाच्या तिकीटावर(underworld don photo on postal stamp) छापल्याची माहिती मिळाली आहे. येथील मुख्य टपाल कार्यालयाकडून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन(chota rajan photo on postal stamp) आणि गँगस्टर मुन्ना बजरंगी यांचे फोटो असलेलं तिकीट प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

टपाल तिकीटावर नेहमी महान व्यक्ती, स्मारकं तसेच चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचे फोटो छापलेले दिसतात. मात्र कानपूरच्या (kanpur)टपाल विभागाने अंडरवर्ल्ड डॉन माफियाचा फोटो पोस्टाच्या तिकीटावर(underworld don photo on postal stamp) छापल्याची माहिती मिळाली आहे. येथील मुख्य टपाल कार्यालयाकडून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन(chota rajan photo on postal stamp) आणि गँगस्टर मुन्ना बजरंगी यांचे फोटो असलेलं तिकीट प्रसिद्ध करण्यात आलं आहे. टपाल विभागाच्या ‘माय स्टॅम्प’ योजनेअंतर्गत हे तिकीट काढण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ५ रुपयांची १२ तिकीटं छापण्यात आली आहेत. यामधील १२ फोटोंवर छोटा राजन आणि इतर १२ फोटोंवर मुन्ना बजरंगीचा फोटो आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरु आहे.

postal stamp of chota rajan

केंद्र सरकारकडून २०१७ मध्ये  माय स्टॅम्प योजनेची सुरुवात करण्यात आली. याअंतर्गत कोणतीही व्यक्ती आपला किंवा ओळखीतल्या एखाद्या व्यक्तीचा फोटो टपाल तिकीटावर छापून घेऊ शकतो. यासाठी ३०० रुपये भरावे लागतात. हे तिकीट छापून घेण्यासाठी अर्जदाराला पासपोर्ट साइज फोटो तसेच संपूर्ण माहिती द्यावी लागते. एक फॉर्म भरुन द्यावा लागतो, ज्यामध्ये संपूर्ण माहिती घेतली जाते. मृत व्यक्तीचा फोटो टपाल तिकीटावर छापत नाहीत. यासाठी अर्जदाराला कार्यालयात हजर राहावं लागतं. मात्र या प्रकरणी टपाल कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, टपाल विभागाचे पोस्ट मास्टर जनरल वीके वर्मा यांनी सांगितलं आहे की, “नियमाअंतर्गत तिकीट काढू इच्छिणाऱ्या व्यक्तीला कार्यालयात हजर राहावं लागतं. तिथे वेबकॅमच्या आधारे फोटो घेतला जातो. जर कोणत्या गुंड किंवा माफियाच्या नावे तिकीट प्रसिद्ध झालं आहे तर चौकशी करुन योग्य कारवाई केली जाईल”.