soldiers

जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यांतील चकुरा भागात आज जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. आतापर्यंत यात  दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शोधमोहीम अजून सुरू आहे.

जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यांतील चकुरा भागात आज जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. आतापर्यंत यात  दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. (two terrorist killed in jammu kashmir) शोधमोहीम अजून सुरू आहे.(search operation is on)

जम्मू-काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया वाढत आहेत. याआधी पाच दिवसांमध्ये जवानांनी राबवलेल्या चार मोहिमांमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी जवानांकडून लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्लादेखील मारला गेला.

लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला याचा तीन दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग होता. ज्यामध्ये सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले होते. आत्मसमर्पण केलेला दहशतवादी डोडा येथील रहिवासी आहे. चौकशी सुरु आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, या वर्षभरात आजतागायत ७५  मोहिमा यशस्वी झाल्या. या मोहिमांमध्ये १८० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.तसेच १३८ दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली.