sex

गुगलच्या डेटामध्ये(Google Data) मात्र भारतीय मोठ्या संख्येने पॉर्न(Porn) पाहत असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे भारतीय कोणत्या वेळेस सर्वाधिक पॉर्नसंदर्भात सर्च करतात याची आकडेवारीही समोर आली आहे.

    अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा(Shilpa Shetty) पती आणि उद्योजक राज कुंद्रा(Raj Kundra Arrest) यांना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास मुंबई पोलिसांनी अटक(Arrest By Mumbai Police) केली. पॉर्न चित्रपटांची(Porn Film) निर्मिती आणि प्रसारण केल्याच्या आरोपाखाली कुंद्रा यांना अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे भारतातील पॉर्न चित्रपट आणि त्यांच्यावरील बंदी, कायदे, नियम याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र असं असतानाच गुगलच्या डेटामध्ये मात्र भारतीय मोठ्या संख्येने पॉर्न पाहत असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे भारतीय कोणत्या वेळेस सर्वाधिक पॉर्नसंदर्भात सर्च करतात याची आकडेवारीही समोर आली आहे.

    गुगल ट्रेंडवर १४ जुलै ते २१ जुलैदरम्यानचा म्हणजेच आठवड्याभराचा डेटा पाहिल्यास लक्षात येतं की भारतीय रात्री पॉर्नसंदर्भात सर्वाधिक सर्च करतात. त्यातही रात्री दीड वाजता पॉर्नबद्दल सर्च करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण सर्वाधिक आहे. १४ जुलै ते २१ जुलैदरम्यान रोज रात्री दीडच्या सुमारास पॉर्न या टर्मबद्दल सर्वाधिक सर्च झाल्याचं दिसून येतं. रात्री साडे नऊपासून पॉर्नसंदर्भातील सर्चचा ग्राफ वर जाऊ लागतो आणि दीडच्या आसपास उच्चांक गाठतो. त्यानंतर पहाटे साडेपाचपासून ग्राफ पुन्हा खाली जात असल्याचं गुगल ट्रेण्डमध्ये दिसतं.

    तर पॉर्न ही टर्म सर्वाधिक सर्च करणाऱ्या राज्यांमध्ये आश्चर्यकारकरित्या पूर्वेकडील राज्य आघाडीवर असल्याचं चित्र या ट्रेण्डमधून दिसून येत आहे. मणिपूर, मिझोरम आणि नागालँड ही तीन राज्ये पॉर्नसंदर्भात सर्च करण्यामध्ये अनुक्रमे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर आहेत त्या खालेखाल टॉप पाचमध्ये असणारी अन्य दोन राज्येही पूर्वेकडील राज्यांपैकीच आहेत. अरुणाचल प्रदेश चौथ्या तर आसाम पाचव्या स्थानी आहे. त्या खालोखाल मेघालय, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरचा क्रमांक सर्वाधिक पॉर्न सर्च करणाऱ्या राज्यांच्या यादीत आहे.

    अकराव्या क्रमांकावर पंजाब, १२ व्या क्रमांकावर त्रिपुरा, १३ व्यावर पश्चिम बंगाल, १४ व्या स्थानी आंदमान निकोबार, १५ व्या स्थानी गुजरातचा समावेश आहे. उत्तर प्रदेश (१६), उत्तराखंड (१७), राजस्थान (१८), बिहार (१९), छत्तीसगड (२०) या राज्यांचा अव्वल २० मध्ये समावेश आहे. झारखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्ली, ओडिशा ही पुढील पाच राज्य आहेत. या यादीमध्ये महाराष्ट्र २६ व्या स्थानी आहे. महाराष्ट्राखालोखाल गोवा, दादरा नगर हवेली, केरळ आणि दिव दमण यांचाही अव्वल ३० मध्ये समावेश आहे.